मा ना श्री दादाजी भुसे साहेब कृषीमंत्री , मा ना यशोमतीताई ठाकूर पालकमंत्री अमरावती , यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे आढावा बैठक

मा ना श्री दादाजी भुसे साहेब कृषीमंत्री , मा ना यशोमतीताई ठाकूर पालकमंत्री अमरावती , यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे आढावा बैठक

Date 29 सप्टेंबर मा ना श्री दादाजी भुसे साहेब कृषीमंत्री , मा ना यशोमतीताई ठाकूर पालकमंत्री अमरावती , यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे आढावा बैठक पार पडली. या बैठकीत प्रमुखाने मतदारसंघातील महत्वाच्या समस्याच मांडल्या. दर्यापूर विधानसभा मतदारसंघ हा खारपण पट्याचा असून मोठ्या प्रमाणात मुंग आणि उडीद शेतकऱयांनी पेरला होता परंतु सततच्या पावसाने या पिकांवर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव झाल्याने मुंगाचे आणि उडीदाचे पीक संपूर्णपणे नष्ट झाले यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याची नुकसानभरपाई देणेबाबत मा कृषीमंत्री यांना लेखी पत्र देऊन मागणी केली. तसेच सोयाबीनच्या निकृष्ट बियानामुळे झालेले शेतकऱ्याचे नुकसानभरपाई देण्याची मागणी केली . बोगस बियानेविक्री करणाऱयांवर कठोर कार्यवाही करून गुन्हे नोंदविण्याची  मागणी केली. दर्यापूर मतदारसंघाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत (पोकरा) शेतकऱयांना वैयक्तिक योजनेच्या लाभात व्याप्ती वाढवून जिप्सम चे वाटप करण्यात यावे याबाबत विनंती केली तसेच पोकरा अंतर्गत वाटप करण्यात आलेले कपासीचे बोगस बियाण्यामुळे शेतकऱयांच्या झालेल्या नुकसानभरपाई तात्काळ देण्याबाबत मागणी केली 

या बैठकीला माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप , जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण , दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे , आणि कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

नक्की वाचा (Must Read)

अधिक वाचा –Read More

नक्की वाचा (Must Read)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या