आधार कार्ड संदर्भात कोणतीही समस्या असल्यास हा क्रमांक डायल केल्यास तुमच्या भाषेत मिळेल संपूर्ण माहिती

आधार कार्ड संदर्भात कोणतीही समस्या असल्यास हा क्रमांक डायल केल्यास तुमच्या भाषेत मिळेल संपूर्ण माहिती

जर तुम्हाला आधार संदर्भातील कोणतीही समस्या येत असेल तर तुम्ही केवळ एक नंबर डायल करून तुमच्या शंकेचं निरसन करू शकता. आधार संदर्भात तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्ही 1947 या क्रमांकावर संपर्क करू शकता. UIDAI ने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. UIDAI ने त्यांच्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की या क्रमांकावर एकूण 12 भाषांमधून तुमची मदत केली जाईल. UIDAI ने ट्विटरवर अशी माहिती दिली आहे की, आधारशी संबंधित सर्व समस्या एका फोन कॉलच्या माध्यमातून दूर होतील. ही आधार हेल्पलाइन 12 भाषांमध्ये तुमचे सहकार्य करेल - हिंदी, इंग्रजी , तेलुगू , कन्नड , तमिळ , मल्याळम , पंजाबी , गुजराती , मराठी , उडिया , बंगाली , आसामी आणि उर्दू या भाषात ही सेवा उपलब्ध आहे.

1947 या क्रमांकावरील सेवा तुमच्यासाठी 24 तासांसाठी उपलब्ध आहे. या सुविधेसाठी कॉल सेंटर प्रतिनिधी सकाळी सात ते रात्री 11 वाजेपर्यंत (सोमवारी ते शनिवारी) उपलब्ध असतात. रविवारी हे प्रतिनिधी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेतच उपलब्ध असतात. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. याठिकाणी तुम्हाला आधार नोंदणी केंद्र, नोंदणी केल्यानंतर आधार क्रमांकाचे स्टेटस आणि अन्य आधार संबंधातील माहिती मिळेल.

आधार कार्ड हरवल्यास किंवा पोस्टाच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत अद्यापपोहोचले नसल्यासही तुम्ही याठिकाणाहून माहिती मिळवू शकता.

अशाप्रकारे बनवा PVC आधार कार्ड

1. नवीन आधार पीव्हीसी कार्डसाठी तुम्हाला UIDAI च्या वेबसाइटवर जावे लागेल

2.याठिकाणी ' My Aadhaar सेक्शनमध्ये जाऊन Order Aadhaar Pvc Card वर क्लिक करा याठिकाणी तुम्हाला 12 अंकी आधार कार्ड क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्चुअल आयडी किंवा 28 अंकी आधार एनरोलमेंट आयडी टाकावा लागेल.

4. यानंतर सिक्योरिटी कॅप्चा कोड टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करा

5. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइलवर आलेला ओटीपी एंटर करा.

6. यानंतर तुम्हाला आधार पीव्हीसी कार्डाचा प्रीव्यू दिसेल

7.खाली देण्यात आलेल्या पेमेंट करण्याच्या पर्यायावर क्लिक करा

8. पेमेंट पेजवर गेल्यानंतर तुम्हाला 50 रुपये फी भरावी लागेल.

9. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुमच्या आधार पीव्हीसी कार्डाची प्रोसेस पूर्ण होईल 5 दिवसांमध्ये येईल तुमचे आधार पीव्हीसी कार्ड जेव्हा ही प्रोसेस पूर्ण होईल त्यानंतर 5 दिवसांच्या आतमध्ये डिपार्टमेंटकडून भारतीय डाक विभागाकडे कार्ड पाठवले जाईल. पोस्टाच्या माध्यमातून कार्ड तुमच्या घरी पोहोचवले जाईल.

आधार कार्ड डाऊनलोड, अपडेट, नावामध्ये बदल करणे, पत्ता बदल, अधिक जे आधार शी संबधीत अडचणी करीता खालील अधिकृत साईटवर जावे

👉Click here https://www.uidai.gov.in/

आधार म्हणजे काय?


MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

नक्की वाचा (Must Read)

      #अधिक वाचा –Read More#

      नक्की वाचा (Must Read)

      टिप्पणी पोस्ट करा

      1 टिप्पण्या

      1. You'll see large lit-up signs displaying "5¢" or "25¢" or "1¢." If the on line casino is a maze , simply seize a waitress or attendant to be pointed in the best path. High restrict slots, usually $5 and higher, are located in separate rooms or 카지노 'salons', with their own attendants and cashiers. That is, do not appear to be} more probably to|prone to} pay the longer you play. Since the pc all the time pulls up new random numbers, might have} exactly the same chance of hitting the jackpot each single time you pull the handle. The concept that a machine could be "able to pay" is all in the player's head, minimal of|no much less than} in the standard system.

        उत्तर द्याहटवा