कुपोषणावर मात करून ‘सुपोषण’ ही संकल्पना आपल्याला जनमानसात रुजवणे गरजेचे आहे

कुपोषणावर मात करून  ‘सुपोषण’ ही संकल्पना आपल्याला जनमानसात रुजवणे गरजेचे आहे- आमदार बळवंत वानखडे

साल २०१५ पासून आपण दरवर्षी सप्टेंबर महिना हा देशभर पोषण माह म्हणून साजरा करतो. महिला आणि बालकांच्या सकस पोषणाचा प्रश्न भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात देखील मोठा आहे. कुपोषणावर आपल्याला मात करायचीच आहे आणि त्यासाठीच  ‘सुपोषण’ ही संकल्पना आपल्याला जनमानसात रुजवायची आहे. देशाची भावी पिढी सुदृढ आणि बुद्धिमान होण्याकरिता आजच्या माता आणि बालकांचे सकस पोषण होणे आवश्यक आहे. आजच्या बालकांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी, बालकांना योग्य आहार, भरविण्याच्या पद्धती, त्यांची वाढ होत असताना त्यांच्या बौद्धिक वाढीसाठी पालकांनी करावयाचे प्रयत्न, या बाबत प्रत्येक मातेला आणि कुटुंबाला एक प्रकारे साक्षर करण्याची गरज आहे. महिलांच्या पोषणाकडे आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रत्येक महिला व बालकाला योग्य ते पोषण मिळायला हवे.

MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

नक्की वाचा (Must Read)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या