रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या विद्यापीठातील स्मारकाच्या बांधकामाची सद्यस्थिती जाणून घेतली; लवकरच निधी उपलबध करून देणार - आमदार बळवंत वानखेडे

रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या विद्यापीठातील स्मारकाच्या बांधकामाची सद्यस्थिती जाणून घेतली; लवकरच निधी उपलबध करून देणार - आमदार बळवंत वानखेडे 

केरळ व बिहारचे माजी राज्यपाल तथा रिपब्लिकन नेते रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या विद्यापीठातील स्मारकाच्या बांधकामास दिनांक 29  ऑक्टोबर 2018 ला 20 कोटी रुपयांच्या कामांना  प्रशासकीय मान्यता मिळाली होती. 30 ऑक्टोबर 2018 रोजी या स्मारकाचे भूमीपूजन झाले होते त्यानंतर या स्मारकाच्या कामासाठी 2.50 कोटी निधी उपलब्ध झाला होता परंतु तद्नंतर निधी उपलब्ध न झाल्याने स्मारकाचे काम थंड पडले होते. 


याबाबत आज स्वतः विद्यापीठातील स्मारकाच्या कामावर जाऊन बांधकामाची सद्यस्थिती जणूं घेतली. स्मारकाच्या दर्शनी भागात दादासाहेब गवई यांचा पुतळा, छायाचित्र गॅलरी, कन्व्हेन्शन सेंटर, विधिमंडळातील भाषणांची पुस्तके, एमपी थिएटर, गेस्ट हाऊस, म्युझियम, ओपन थिएटर, सभागृह आणि क्लोज थिएटर आदी या असुविधा अन्य असून सद्यस्थितीत काम अर्धवट स्थितीत असल्याचे आढळले याबाबत संबंधित अधिकाऱयांशी व्यक्तीशा बोलून आढावा घेतला निधी उपलब्ध नसल्याने काम बंद असल्याचे निदर्शनास आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून निधी मागणीबाबत केलेल्या पाठपुराव्याची माहिती घेतली व कागदपत्रे मागवून घेतली. स्मारकाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी आदेश दिले ,यापुढे निधी उपलब्धतेसाठी जिल्हास्तरावर आणि मंत्रालयीन स्तरावर बैठक आणि पाठपुरावा करणार आहे.

MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

नक्की वाचा (Must Read)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या