अखेर आमदार बळवंत वानखडे यांच्या प्रयत्नाला यश!
रमाई आवास योजने अंतर्गत रखडलेल्या घरकुलांसाठी समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासनातर्फे 100 कोटीचा निधी मंजूर
अमरावती जिल्ह्यातील ‘रमाई आवास योजना’ अंतर्गत घरकुल
लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून द्या! आमदार बळवंत वानखडे यांच्या मागणीनुसार 100
कोटीचा निधी मंजूर!
अमरावती जिल्ह्यातील ‘रमाई आवास योजना’ अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना जिल्हा नियोजन समितीमार्फत
जिल्हा वार्षिक योजनेतून समाजकल्याण विभागामार्फत निधी मिळत होता. परंतू सन 2016
पासून सदर निधी मिळणे बंद झाला होता.
आदिवासी विभागामार्फत राबविण्यात
येणाऱ्या घरकुल योजनेचा निधी जिल्हा वार्षिक योजनेमधून दिल्या जात असे. परंतू रमाई
आवास योजनेचा निधी कोणत्या विभागामार्फत वितरीत करण्यात येणार याबाबत संभ्रम
निर्माण झालेला असल्याने सन 2016 पासून निधी अप्राप्त असल्याने मोठ्या प्रमाणावर
घरकुल लाभार्थी लाभापासून वंचित होते.
Amravati जिल्ह्यातील ‘रमाई आवास योजना’ अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना निधी
मिळण्याबाबत दर्यापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बळवंत वानखडे यांनी सामाजीक
न्याय विभागास पत्र लिहून कळविले असता मा. ना. श्री. धनंजय मुंडे साहेब यांनी याबाबत
दखल घेवून रमाई आवास योजनेसाठी समाज कल्याण आयुक्तालयाने 100 कोटी रुपये संचालक,
ग्रामीण गृहनिर्माण यांचेकडे हस्तांतरित केलेले आहेत. थोड्याच दिवसात आपणास ही रक्कम
पी. एफ. एम. एस. द्वारे उपलब्ध होईल. पुढील तपशीलासाठी कृपया संचालक
ग्रामीण गृहनिर्माण यांच्याशी संपर्क साधावा.
Video पाहण्यासाठी येथे Click करा 11 सप्टेंबर 2020 रोजी प्रसारीत केलेला Video
MLA Balwant Wankhadeजनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर
नक्की वाचा (Must Read)
- संजय गांधी निराधार योजना तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी तपशिल पहा
- अटल पेन्शन योजना तपशिल पहा
- आंतरजातीय विवाह योजना तपशिल पहा
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना तपशिल पहा
- पंतप्रधान सुरक्षा विमा योजना तपशिल पहा
- घरगुती कामगार योजना तपशिल पहा
- आयुष्मान भारत योजना तपशिल पहा
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तपशिल पहा
- प्रधान मंत्री उज्ज्वला योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना तपशिल पहा
- ई-शिष्यवृत्ती तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- प्रधानमंत्री किसान सम्मान योजने अंतर्गत लाभ प्राप्त शेतकरी यांची यादी तपशिल पहा
- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
नक्की वाचा (Must Read)
0 टिप्पण्या