संजय गांधी निराधार योजना

संजय गांधी निराधार योजना

 क्षेत्र: सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग

Sanjay Gandhi Niradhar Yojana

लाभार्थी

Sanjay Gandhi Niradhar Yojana या योजनेतंर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी,35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.

संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे : 
  • 1)      १५ वर्षे स्थानिक वास्तव्य दाखला
  • 2)     उत्पन्न दाखला ( मुळ प्रत )
  • 3)     रेशनकार्ड
  • 4)    मयत दाखला
  • 5)    मुलांचे जन्म नोंद / बोनाफाईड
  • 6)     मुलांसोबत पासपोर्ट साईज फोटो
  • 7)    आधार कार्ड
  • 8)    घर पट्टी / लाईट बिल / भाडे पवती / करार
  • 9)     निवडणूक ओळखपत्र
अपंग असल्यास जिल्हा सिव्हील दवाखान्याचा दाखला

या योजनेचा लाभ घेण्यासाठी, व्यक्ती

1.       महाराष्ट्र रा असावे

2.      कोणतीही उत्पन्न स्रोत असणे आवश्यक

3.       जमीन मालक असू नये

4.     भिकारी असू नये.

या योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी, अर्ज सरकार कार्यालयात उपलब्ध आहेत. अर्ज करून साधले पाहिजे

1.       वैद्यकीय अधिकारी जारी केलेल्या वयाचा दाखला.

2.      शाळा प्रमाणपत्र.

3.       तलाठी यांनी जारी उत्पन्नाचा दाखला.

फायदे:

Sanjay Gandhi Niradhar Yojana या योजनेखाली पात्र होणा-या कुटूंबात एक लाभार्थी असल्यास रुपये 600/- प्रतिमहा तर एका कुटूंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास, रुपये 900/- प्रतिमहा इतके आर्थिक सहाय्य दिले जाते.

अर्ज कसा करावा

Sanjay Gandhi Niradhar Yojana अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो. संपर्क कार्यालयाचे नाव-जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या