दर्यापूर व अंजनगाव तालुक्यातील सर्व गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या शहानूर प्रकल्पात आजच्या घडीला किती पाणी पुरवठा आहे. उन्हाळ्यात तालुक्यातील अनेक गावांना भेडसणारी पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी दर्यापूर - अंजनगाव मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडे यांनी आज प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना पुढील काळात पाणी टंचाई समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.
तालुक्यातील काही गावांमध्ये सध्या पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे आणि पाणीटंचाई निवारणाची उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार बळवंत वानखडे यांनी प्रत्यक्ष शहानूर धरनावर जाऊन तेथील पाणी साठा किती टक्के आहे याची माहिती घेतली आणि लवकरात लवकर पाणीटंचाई कशी दूर होईल याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी सुरेश
चारथळ, कोपुलवार, डेप्युटी इंजिनीअर देशकर, ज्युनिअर इंजिनिअर शेंडे गणेश देशमुख अंजनगाव
येथे उपस्थित होते.
0 टिप्पण्या