श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

श्रावण बाळ निवृत्ती वेतन पेन्शन योजना

Shravan Bal Yojana

पात्र लाभार्थी – राज्यातील 65 व 65 वर्षावरील निराधार वृध्द व्यकतींना मासिक निवृत्तीवेतन देण्याच्या मूळ हेतूने श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन येाजना राबविण्यात येते

श्रावण बाळ निवृत्ती वेतन पेन्शन योजना लागणारी कागदपत्रे

  • १)     १५ वर्षे स्थानिक वास्तव्य दाखला
  • २)      उत्पन्न दाखला ( मुळ प्रत )
  • ३)      रेशनकार्ड
  • ४)      मयत दाखला
  • ५)     मुलांचे जन्म नोंद / बोनाफाईड
  • ६)     मुलांसोबत पासपोर्ट साईज फोटो
  • ७)     आधार कार्ड
  • ८)     घर पट्टी / लाईट बिल / भाडे पवती / करार
  • ९)     निवडणूक ओळखपत्र
  • १०) अपंग असल्यास जिल्हा सिव्हील दवाखानाचा दाखला

        टीप : - फॉर्म घेणेसाठी मूळ रेशनकार्ड व मूळ मयत दाखला , अपंग दाखला घेऊन येणे.ही ६४ वय पेक्षा असणाऱ्या करिता .

पात्रतेचे निकाष/अटी – 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असणे आवश्यक. वय -65 व 65 वर्षापेक्षा अधिक,कुटूंबाचे नाव ग्रामीण / शहरी भागाच्या द्रारीद्रय रेषेखालील कुटूंबाच्या यादीत समाविष्ट असावे किंवा कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 21000 /- पर्यत असावे

शाखा/विभागा अंतर्गत करण्यात येणा-या कामाचा तपशिल –

आर्थीक सहाय्य – राज्यातील 65 व 65 वर्षावरील द्रारीद्रयरेषेखालील कुटूंबाच्या यादीत नाव असलेल्या निराधार स्त्री व पुरषांना केंद्र शासनाच्या इंदीरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेमधून प्रतिमाह रुपये 200 /- निवृत्तीवेतन देण्यात येते.तसेच या योजनेस पुरक असलेल्या राज्य शासनाच्या Shravan Bal Yojana श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून प्रतिमाह रुपये 400/- इतके निवृत्तीवेतन देण्यात येते म्हणजेच प्रतिमा 600 इतके वेतन देय आहे.याला श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट अ म्हणतात.  श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट ब ही योजना जे खरोखर गरजू निराधार वृध्द आहेत मात्र द्रारीद्रय रेषेखालील यादी मध्ये ज्यांची नोंद नाही व त्यांच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 21000 /- पर्यंत असेल तर अशा वृध्दांना संपूर्ण रुपये 600 /- इतके श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट ब मधून देय आहे

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजना (पीडीफ,4.4 MB) 

MLA Balwant Wankhade 

जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या