अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पुरग्रस्त भागातील नुकसानाची आमदार वानखडे यांनी केली पाहणी.


अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पुरग्रस्त भागातील नुकसानाची आमदार

वानखडे यांनी केली पाहणी.

    सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे शहानूर धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने शहानुर धरणांतर्गत येणाऱ्या पानलोट क्षेत्रामध्ये पाण्याचा प्रवाह अधिक वाढल्याने धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात आले होते यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ होवून त्याचा फटका नदीकाठच्या गावांना बसला अडगाव खाडे, हसनापूर पार्डी, अंजनगाव सुर्जीसह इतर भागात पाणी शिरल्याने वास्तव्यास असलेल्या नागरीकांच्या शेतीचे आणि घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले याबाबत माहिती मिळताच आज दि. २३/०९/२०२० रोजी तहसिलदार घुगे साहेब आणि अन्य विभागाचे अधिकारी यांच्या समवेत दौरा करून परिस्थीतीचा आढावा घेतला तसेच नुकसान झालेल्या शेतीचे, घरांची पाहणी केली.

नुकसान भरपाईचे सर्वेक्षण करून अहवाल शासनाकडे पाठवण्याबाबत प्रशासनाला आदेशीत केले तसेच पुन्हा पावसाच्या पाण्याने नुकसान झाल्यास प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेशीत केले. जिल्हाधिकारी महोदयांसोबत चर्चा करून आपत्ती व्यवस्थापणची टिम (SDRF) अंजनगाव शहरात प्राचारण करण्यास सांगितले या वेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद दाळू, सरपंच संघटनेचे राज्य अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, माजी सरपंच माकोडे ग्रामसेवक, अनिल अलोकार, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

नक्की वाचा (Must Read)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या