हाथरस घटनेचा निषेध: आ. बळवंत वानखडे व काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या समवेत अंजनगाव सुर्जी तहसिल कार्यालयावर धरणे आंदोलन
अंजनगाव
सुर्जी, ता. ५: केंद्रात असलेल्या भाजप सरकारने केलेले कायदे शेतकऱ्यांना घातक ठरणारे
असल्याने या कायद्यांविरोधात तसेच उत्तर प्रदेशातील या हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ
येथील तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष
प्रमोद दाळू व शहराध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर सोमवारी
(ता. ५) धरणे आंदोलन केले. या वेळी आमदार बळवंत वानखडे यांनी धरणे मंडपाला भेट देत
आंदोलनात सहभाग नोंदविला.
केंद्र सरकारने देशातील शेती व शेतकऱ्यांविरोधात मोठे छडयंत्र
रचले असून तीन काळे कायदे करीत हरित प क्रांती नष्ट करण्याचा कुटील डाव रचला आहे. जगाचा
पोशिंदा असलेला अन्नदाता शेतकरी व शेतमजूर यांना य काही उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचे
छड्यंत्र असल्याने त्याविरोधात आणि
उत्तर
प्रदेशातील हाथरस येथील एका तरुणीवर अत्याचाराच्या घटनेबाबत तेथील शासनाने कारवाईबाबत
घेतलेली भूमिका याविरोधात येथील तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता.५) स्थानिक
तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तहसीलदार विश्वनाथ
घुगे यांच्यामार्फत निवेदन सादर केले. या वेळी तालुकाध्यक्ष प्रमोट दाळू, शहराध्यक्ष
प्रदीप देशमुख, अरुण चौखंडे , हेमंत येवले , पुरुषोत्तम घोगरे , राजू कुरेशी , बबलू
काळमेघ , सुरेश आडे , सुधाकर खारोडे , संजय कळमेघ , मुरलीधर नाईक , महेश ढोके , रमेश
सावळे , कैलास सिरसाट , नीलेश ढगे , नीलेश घोडेराव , शरद लव्हाळे , मनोज सुकळकर , सुभाष
गीते , तायडे , राजू दाळू , रणजित दाळू , धनराज राठोड , मुश्ताकभाई , अशोक चरपे , नाना
गीते , मोहसीनभाई , अमोल घुरडे , ज्ञानेश्वर मुरतकर आदी उपस्थित होते.
MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर
नक्की वाचा (Must Read)
अधिक वाचा –Read More
नक्की वाचा (Must Read)
- संजय गांधी निराधार योजना तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी तपशिल पहा
- अटल पेन्शन योजना तपशिल पहा
- आंतरजातीय विवाह योजना तपशिल पहा
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना तपशिल पहा
- पंतप्रधान सुरक्षा विमा योजना तपशिल पहा
- घरगुती कामगार योजना तपशिल पहा
- आयुष्मान भारत योजना तपशिल पहा
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तपशिल पहा
- प्रधान मंत्री उज्ज्वला योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना तपशिल पहा
- ई-शिष्यवृत्ती तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- प्रधानमंत्री किसान सम्मान योजने अंतर्गत लाभ प्राप्त शेतकरी यांची यादी तपशिल पहा
- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
नक्की वाचा (Must Read)
0 टिप्पण्या