सी.एस.सी. केंद्र संचालकावर कठोर कार्यवाही करून संचालकांमार्फत शेतकऱ्याचे झालेले नुकसानाची भरपाई देण्यात यावी मा. आमदार बळवंत वानखडे

सी.एस.सी. केंद्र संचालकावर कठोर कार्यवाही करून संचालकांमार्फत शेतकऱ्याचे झालेले नुकसानाची भरपाई देण्यात यावी मा. आमदार बळवंत वानखडे

                  अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यानी मोठ्या प्रमाणात पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत फळबाग, खरीप आणि रब्बी पिकांचे पीक विमा काढले आहेत. अचलपूर तालुक्यातील गौरी कॉम्पुटर इन्स्टिट्यूट व आपले सरकार केंद्र सी.एस.सी. कुष्ठा बु. येथे तालुक्यातील शेतकऱ्यानी मोठ्या प्रमाणात पिक विम्याचा भरणा केला. सदर केंद्राच्या संचालकांमार्फत शेतकऱ्याकडून प्रती हेक्टरी पीक विम्याची पूर्ण रक्कम घेतली परंतु पीक विमा कंपन्यांकडे प्रती हेक्टरीच्या तुलनेत संचालकांमार्फत अल्प प्रमाणात पीक विमा भरण्यात आला होता. शेतकऱ्याना पूर्ण पीक विमा भरल्याची खोटी पावती सदर केंद्राच्या संचालकांमार्फत देण्यात आली.

                सद्यस्थितीत परिस्तिथी लक्षात घेता अचलपूर तालुक्यात आणि जिल्ह्यात पीक विमा लागू झाला असून शेतकऱ्याच्या खात्यात पीक विमा रक्कम जमा होत असून प्रत्यक्षात अपेक्षित असलेली रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्याच्या मनात शंका निर्माण झाली याबाबत चौकशी केली असता सदर केंद्राच्या संचालकांमार्फत शेतकऱ्याकडून घेतलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम भरल्याचे‍ निदर्शनास आले याचा आर्थिक फटका शेतकऱ्यानां बसला आहे.

अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार बळवंत वानखडे यांना निवेदनातून त्यांच्या समस्या व्यक्त केल्या व याबाबत त्यांनी दखल घेतांना शेतकऱ्याकडून पीक विम्याचा भरणा करण्यासाठी सी.एस.सी. केंद्राद्वारे न भरता बँकेमार्फत भरण्याबाबत संबंधित पीक विमा कंपन्यांना निर्देश द्यावे व सदर सी.एस.सी. केंद्र संचालकावर कठोर कार्यवाही करून संचालकांमार्फत शेतकऱ्याचे झालेले नुकसानाची भरपाई करण्यात यावी याबाबत मा. आमदार बळवंत वानखडे यांनी मा. जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिक्षक यांना लेखी पत्राद्वारे सुचित केले आहे.

MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

नक्की वाचा (Must Read)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या