मा. मंत्री महोदयांसमोर मतदारसंघातील प्रामुख्याने प्रलंबित मागण्यांसंबंधी मुद्दे उपस्थित करतांना आमदार बळवंत वानखडे

मा. मंत्री महोदयांसमोर मतदारसंघातील प्रामुख्याने प्रलंबित मागण्यांसंबंधी मुद्दे उपस्थित करतांना आमदार बळवंत वानखडे

    काल  दिनांक २५ सप्टेंबर २०२० रोजी मा. ना श्री. राजेशजी टोपे साहेब, मंत्री- सार्वजनिक आरोग्य विभाग, मा. ना. श्री. डॉ राजेंद्रजी शिंगणे, मंत्री- अन्न व औषध प्रशासन विभाग, मा. ना. श्रीमती यशोमातीताई ठाकूर, पालकमंत्री अमरावती जिल्हा, मा श्री बबलूभाऊ देशमुख अध्यक्ष जि.प. अमरावती यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील कोवीड-१९ बाबत आढावा बैठक पार पडली. 

यात मतदारसंघातील प्रामुख्याने प्रलंबित मागण्यांसंबंधी मुद्दे उपस्थित केले. 

* सातत्याने पाठपुरावा करीत असलेल्या अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धीत करण्यासंबंधी मागणी केली. 

* कोविड-१९ चा वाढता प्रभाव  रुग्नांना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन चा अत्यल्प पुरवठा वाढविण्याची प्रामुख्याने मागणी केली. 

* दर्यापूर आणि अंजनगाव दोन्ही तालुक्यात कोविड-१९ च्या रुग्नांसाठी वाढीव बेड  मिळण्यात यावे यासाठी मागणी केली. तसेच स्वंतत्र तात्पुरते कोविड हॉस्पिटल उभारण्यात यावे, 

* मतदारसंघातील रिक्त असलेले आरोग्य विभागाचे पदे तातडीने भरण्यात यावे, अंजनगाव सुर्जी  ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक पद  भरण्यात यावे. 

* प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्याचे मानधन ३ महिन्यापासून प्रलंबित आहेत ते तातडीने अदा करण्यात यावे. 

* राष्टीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत ग्रामीण भागातील आशा वर्कर व गटप्रवर्तिका यांना २०००/ व ३०००/ मानधन वाढीचा निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी. 

* माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियाना अंतर्गत कार्यरत आशा वर्कर व गटप्रवर्तिका यांना ३००/ प्रती रोज प्रमाणे दैनिक भाता देण्यात यावा. शासनाने गटप्रवर्तिका यांना मिळणाऱ्या २५ रु प्रती रोज व ६२५ रु प्रती महिना हा भत्ता बंद केला असून २५० रु डाटा एंट्रीचा भत्ता देखील बंद केला आहे सदर भत्ता तातडीने वाढीव दराने सुरु करण्यात यावे. 

* कोविड- १९ च्या प्रादुर्भावाने मृत आरोग्य कर्मचाऱयांना  आशा वर्कर गटप्रवर्तिका तातडीने विम्याचा लाभ देण्यात यावा. आशा व गटप्रवर्तिका यांना कंत्राटी कर्मचारी प्रमाणे पगारी प्रसूती राजा व इतर सुविधेकरिता लाभ देण्यात यावा त्यांच्या मानधनात ५% वाढ करण्यात यावी. या विविध मागण्या कालच्या आढावा सभेत मांडल्या. यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप, जि. प आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जिल्ह्यातील अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते


MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

नक्की वाचा (Must Read)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या