अंजनगाव सुर्जी
तालुक्यातील असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून नेला
आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. आमदार बळवंत वानखडे
यांनी शेतात जाऊन नुकसानाची पाहणी केली आहे. नुकत्याच आलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस
व गारपिटीने अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अनेक गावातील कांदा उत्पादन शेतकऱ्यांचे मोठ्या
प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त गावांना आमदार बळवंत वानखडे यांनी भेट देऊन
प्रत्यक्ष शेतकऱ्यांमध्ये जावून पिकाची पाहणी केली. त्यामध्ये कुंभारगाव, चिंचोली,
मुरा, वरूडा, कालवाडा, विहीगाव, सातेगाव आदी गावांचा समावेश आहे. आमदार बळवंत वानखडे
यांनी कृषी सहाय्यक, पटवारी यांना नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून लगेच पाठविण्याचे
आदेश दिले. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत आपण पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर व
मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून सदर प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे
त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी शासनाचे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली
आहे.
1 टिप्पण्या
Customers CNC machining can get an correct quote on a product, and that product may be started the following day by War Fab. Following every course of guarantees the manufacturing of high-quality ultimate products. Use the Formech vacuum former, sandblasting station, plastic strip heater, saws and sanders to control plastics, foams, and other supplies into prototypes and large-scale projects. Our Modularization and Fabrication – Gulf Coast hub in Houston, Texas makes use of the latest manufacturing applied sciences to build modules for energy and chemical compounds projects of all sizes. And encompasses many years of modular design and constructability knowledge.
उत्तर द्याहटवा