'राजगृह' चा अवमान करणाऱ्यांची गय करणार नाही- मुख्यमंत्री


राजगृह ही वास्तू हे केवळ आंबेकरी जनेची नव्हे तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. या श्रद्धास्थाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. पोलिसांना या प्रकरणाची कडक कारवाईचे आदेश देण्यात आले. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पस्ट केल.

दादर हिंदू कॉलनी येथे राजगृह हे बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. मंगळावारी सायंकाळी दोन अज्ञात व्यक्तीनी इमारतीच्या आवारात शिरून मोठ्या प्रमाणात तोडफोड व नासधूस केली. घराच्या काचांवर दगडफेक केली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनाही लसयक्ष करण्यात आले होत. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबात प्रतिक्रीया दिली आहे. राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपल्या ग्रंथ खजीना डॉ. बाबासाहेब आंबेडयकर यांनी या वास्तूत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमान जनतेचे हे तीथर्हश्रेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांनची सरकार गय करणार नाही.  कडक  करावाईचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत, अस मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे.


मनुवादी मनोवृत्ती संपवू शकत नाही! राजगृह हे देशातील तमान जनतेसाठी एक महत्वाचं उर्जा केंद्र आहे. या निवासस्थानाची केलेली तोडफोड ही अत्यंत निंदनी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेउकर यांचे विचार हे देशातील प्रत्येक नागरीकांच्या मनात खेलवर रूजलेले आहेत. केाणीही महनुवादी विघातक मनोवृती हे विचार कदापी संपवू शकत नाही. असा भ्याड हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल . राज्यात व देशातील नागरीकांनाी संयम ठेवून शांतता पाळवी, असं आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांनी केलं आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या