अंजनगाव सुर्जी येथील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना चेक वितरण करतांना-आमदार बळवंत वानखडे

अंजनगाव सुर्जी तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केलेली बियाणे उगवलेच नसल्याने अशा बोगस बियाणे पुरवणारे बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार यावे असे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केल्यावर आमदार बळवंत वानखडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आदेश देवून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.

            त्यानुसार या विषयाची दखल घेवून संबंधीत कृषी संजीवनी विक्रांत कंपनीने नुकसान झालेल्या शेतीचे सर्वेक्षण आणि पंचानमे करून शेतकऱ्यास नुकसानभरपाई देवून मानुसकीचा कौल निर्माण केले आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आज दि. 09/07/2020 पं.स. अंजनगाव सुर्जी येथे मा. आमदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थीतमध्ये चेक वितरण करण्यात आले. यावेळी समितीचे सभापती सौ प्रियंका ताई दाळू, उपसभापती महेश भाऊ खारोड, बिडिओ भालके, कृषी अधिकारी अश्विन राठोड व शेतकरी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या