गेल्या २५ वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहे. राजकारणातून सामाजिक कार्य करीत असताना टीका होत असतात परंतु प्रत्येक टीकेला उत्तर देण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करण्यावर माझा भर असतो. परंतु मागील काही दिवसात स्वयंघोषित स्टार पत्रकार ज्यांना काहीच माहिती नसताना लोकांच्या समस्याचा अभ्यास नसताना माझ्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत. फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठी माझ्या विरोधात वृत्तपत्रात लिहण्यात येत आहे. परंतु त्यासंबंधी मला कधी प्रत्यक्षात भेटून बोलून काही मुलाखत घेऊन मला जनतेच्या समस्येसाठी काय पाठपुरावा केला काय मागणी केली याबद्दल न विचारता हेतुपुरस्पर माझ्याबाबत वृत्तपत्रात छापल्या गेले याबाबत माझ्यावर झालेल्या आरोपांचा खुलासा करीत पाठपुरावाच्या अनुशंघाने पुरावे देत आहे
जनतेचे माझ्यावर प्रेम आहे त्यांच्यासाठी माझे कार्य नेहमीच सुरु आहे व सुरु राहील.
आपल्या सेवेत सदैव
आपलाच
बळवंत वानखडे
0 टिप्पण्या