स्व .बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना-
Late Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme for Maharashtra
Balasaheb Thackeray
insurance Scheme apply online
Balasaheb Thackeray
insurance Scheme Form
Balasaheb Thackeray vima
yojana in Marathi
Balasaheb Thackeray
insurance Scheme Details
अपघातग्रस्त रुग्णांना वेळीच गोल्डन आवर मध्ये उपचार मिळाला
व रुग्णांना जवळच्या रुग्णालयात स्थलांतरित केले तर मृत्यूचे व अपंगत्वाचे प्रमाण कमी
होण्यास मदत होईल. विशेषत: अस्थिभंग च्या रुग्णांना तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने
स्थिर करून स्थलांतरित केल्यास त्यामुळे होणारे नुकसान टाळता येवू शकेल. तसेच अपघातग्रस्त
रुग्णास रक्तस्त्राव होत असेल व अशा रुग्णास वेळेवर स्थलांतरित केल्यामुळे रक्त व रक्तघटक
मिळून रुग्णाचे प्राण वाचतील. तसेच मेंदुला इजा झालेल्या रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन
देऊन व योग्य पद्धतीने स्थलांतरित केल्यास अशा रुग्णाचा मृत्यू व मेंदूची इजा कमी होण्यास
मदत होईल. अपघात ग्रस्त रुग्णांना वेळीच गोल्डन आवर मध्ये उपचार मिळावा व लवकरात लवकर
जवळच्या रुग्णालयात स्थलांतरित करण्याचे उद्दीष्ट विचारात घेऊन दिनांक १६.०९.२०२०
रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा
योजनेस मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार राज्यात या योजनेची अंमलबजावणी करण्याची
बाब शासनाच्या विचाराधीन होती.
राज्यात रस्ते अपघातग्रस्त रुग्णांना तत्पर (Golden Hour मध्ये)
वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी स्व .बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना
संपूर्ण राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
सदर योजनेचे स्वरुप व कार्यपद्धती खालीलप्रमाणे राहील:
१) योजनेचे उद्दिष्ट: - अपघातानंतर पहिल्या
७२ तासात रस्ते अपघात झालेल्या व्यक्तीस तत्पर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे.
२) योजनेचे लाभार्थी: - महाराष्ट्राच्या भौगोलिक
सीमेतील कोणत्याही रस्त्यांवर अपघातामध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या व वैद्यकीय उपचाराची
तात्काळ आवश्यकता असलेल्या व्यक्ती (अधिवासाच्या अटीशिवाय) या योजनेचा लाभ मिळण्यास
पात्र असतील. औद्योगिक अपघात, दैनंदिन कामातील किंवा घरी घडलेले अपघात व रेल्वे अपघाताने
जखमी होणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच द्विरुक्ती टाळण्यासाठी
या योजनेच्या लाभार्थ्यास शासनाच्या / शासन अंगिकृत उपक्रमाच्या अपघात प्रतीपूर्तीच्या
इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही.
३) योजनेंतर्गत देण्यात येणारे लाभ: - रस्ते अपघातातील जखमी झालेल्या रुग्णांची परिस्थिती स्थिर करण्यासाठी लागणाऱ्या
वैद्यकीय सेवा पहिल्या ७२ तासासाठी नजीकच्या अंगीकृत रुग्णालयामधून ७४ उपचार पद्धतींच्या
(परिशिष्ट - अ) माध्यमातून देण्यात येतील. योजनेंतर्गत अपघातग्रस्त रुग्णास पूर्णपणे
मोफत वैद्यकीय उपचारांचा लाभ देण्यात येईल. प्रति रुग्ण प्रति अपघात रुपये ३०,०००
/ - (रू. तीस हजार) पर्यंतचा खर्च अंतिम केलेल्या package च्या दरानुसार या योजनेंतर्गत
अंगीकृत रुग्णालयास विमा कंपनीकडून अदा करण्यात येईल. स्थलांतरित करण्यात आलेल्या रुग्णालयात
पुढील उपचाराच्या सेवा उपलब्ध नसल्यास अशा सेवा उपलब्ध असणाऱ्या जवळच्या रुग्णालयात
१०८ रुग्णवाहिकेने, ती उपलब्ध नसल्यास पर्यायी रुग्णवाहिकेने रुग्ण स्थलांतरित केला
जाईल. अशा परीस्थितीत package च्या दराव्यतिरिक्त रुपये १००० पर्यंत रुग्ण वाहिकेचे
भाडे विमा कंपनी मार्फत अंगीकृत रुग्णालयास देण्यात येईल. रुग्णालय जर महात्मा ज्योतिबा
फुले जन आरोग्य योजना/प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत मान्यताप्राप्त असेल व रुग्ण
सदर योजनेचा लाभार्थी असेल व होणारे उपचार योजनेपैकी असून त्याची पूर्व मंजुरी मिळाली
असेल तर त्या उपचारासंबंधी या योजनेची रक्कम रुग्णालयास मिळणार नाही. अशा परिस्थितीत
रुग्णालयास महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या/प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या
पॅकेज ची आर्थिक तरतूद रुग्णालयास मिळेल.
४) रस्ते अपघात प्रतिसाद: - अपघात स्थळाच्या
जवळ असलेली कुठलीही व्यक्ती १०८ या क्रमांकावर दूरध्वनी करून रुग्णवाहिका घटनास्थळी
बोलावेल. आपात्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS- Maharashtra Emergency Medical Services)
furig gerea पृष्ठ २१ पैकी २ शासन निर्णय क्रमांक रअयो -२०१६ / प्र.क्र .२६० / आरोग्य
६ , दिनांक १४ ऑक्टोबर , २०२० रुग्णवाहिका पाठविली जाईल . १०८ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास
जवळची शासकीय रुग्णवाहिका, ती उपलब्ध नसल्यास खासगी रुग्णवाहिकेने रुग्णास जवळच्या
अंगीकृत रुग्णालयामध्ये नेण्याची परवानगी असेल. अपघातग्रस्त रुग्णास रुग्णालयामध्ये
नि:शुल्क वैद्यकीय सेवा व उपचार दिले जातील. व्यक्ती रुग्णालयात भरती झाल्यापासून पहिल्या
७२ तासांमध्ये दिलेल्या उपचारांच्या खर्चापोटी विमा कंपनी मार्फत रुग्णालयांचे दावे
अदा करण्यात येतील.
५) योजनेंतर्गत रुग्णालयात दाखल झाल्यापासून ७२ तासापर्यंत निशुल्क अनुज्ञेय
सेवा: - रुग्णालयात दाखल झाल्यापासून ७२ तासापर्यंत खालील
निशुल्क वैद्यकीय सेवा अनुज्ञेय राहतील.
- 1.जखमेतून होणारा रक्त प्रवाह थाबविणे, जखमेस टाके घालणे तसेच ड्रेसिंग करणे असे प्राथमिक उपचार करणे.
- २. अति दक्षता विभाग व वार्डमधील उपचार.
- ३ अस्थिभंग, हेड इंज्युरी, पाठीच्या मणक्याला झालेली दुखापत, जळाल्यामुळे झालेली दुखापत यावरील उपचार.
- ४. अस्थिभंग रुग्णासाठी आकस्मिक परीस्थितीत लागणारे इम्प्लांट्स् देणे
- ५. रुग्णास साधारण रक्तस्त्राव झाला असेल तर रक्त (Whole blood) देणे, अतिरक्तस्त्राव झाला असल्यास रक्त घटक पी.सी.व्ही. (Packed cell volume) देणे, अपघातामुळे जळालेला रुग्ण आल्यास आवश्यकते प्रमाणे रक्त घटक प्लाझ्मा (Plasma) देणे, अपघातामुळे अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे आवश्यकते प्रमाणे ताजे रक्त किंवा रक्त घटक बिम्बिका (Platelets) देणे.
- ६. तज्ञांनी सुचविलेल्या ७४ प्रोसिजर्स मधील विविध तपासण्या व औषधोपचार (परिशिष्ट - अ नुसार).
- ७. रुग्णाच्या रुग्णालयातील वास्तव्याच्या कालावधीत भोजन
· ६) अंगीकृत रूग्णालये: - Emergency आणि Polytrauma sevices देण्याची सोय असणारी सर्व शासकीय आणि इच्छुक खाजगी रुग्णालये तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधील Emergency आणि Polytrauma sevices साठी इच्छुक अंगीकृत रुग्णालयांना या योजनेंतर्गत अंगीकृत करण्यात येईल. १०८ रुग्णवाहिकेद्वारे किंवा ती उपलब्ध नसल्यास इतर पर्यायाने अपघातग्रस्त रुग्णास अंगीकृत रुग्णालयात स्थलांतरित केले जाईल. अंगीकृत रुग्णालयांची GPS द्वारे mapping केली जाईल. उपलब्ध उपचार सुविधेच्या आधारे रुग्णालयाची वर्गवारी करण्यात येईल. ही योजना विमा कंपनी मार्फत राबविण्यात येणार असून निविदा पद्धतीने निवडण्यात आलेली विमा कंपनी व राज्य आरोग्य हमी सोसायटी तसेच विमा कंपनी व इच्छुक रुग्णालये यांमध्ये करार करण्यात येईल.
नक्की वाचा (Must Read)
#अधिक वाचा –Read More#
नक्की वाचा (Must Read)
- संजय गांधी निराधार योजना तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी तपशिल पहा
- अटल पेन्शन योजना तपशिल पहा
- आंतरजातीय विवाह योजना तपशिल पहा
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना तपशिल पहा
- पंतप्रधान सुरक्षा विमा योजना तपशिल पहा
- घरगुती कामगार योजना तपशिल पहा
- आयुष्मान भारत योजना तपशिल पहा
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तपशिल पहा
- प्रधान मंत्री उज्ज्वला योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना तपशिल पहा
- ई-शिष्यवृत्ती तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- प्रधानमंत्री किसान सम्मान योजने अंतर्गत लाभ प्राप्त शेतकरी यांची यादी तपशिल पहा
- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
नक्की वाचा (Must Read)
1 टिप्पण्या
Bet365 casino promo codes - JtmHub
उत्तर द्याहटवाThe first 태백 출장안마 deposit bonus is required to activate Bet Credits. The bet 서귀포 출장샵 credits you get are the first deposit 나주 출장마사지 bonus you will get. 경상북도 출장마사지 This is a great way to get 속초 출장마사지 started