ओबीसींना स्वंतत्र घरकुल योजना राबविणार- आमदार वानखडे

ओबीसींना स्वंतत्र घरकुल योजना राबविणार- 

मा ना विजय वडेट्टीवार मंत्री मागासवर्गीय कल्याण यांचे आमदार वानखडे यांना आश्वासन 

घरकुल योजना सर्व समाजापर्यंत पोहोचावी यासंदर्भात विधानसभे मध्ये मागणी करताना मा.आमदार बळवंत वानखडे

सण 2020 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी संसदीय आयुधाचा  वापर करून औचित्याच्या मुद्दाद्वारे ओबीसीसाठी स्वंतत्र घरकुल योजना राबविण्याची मागणी केली होती. राज्यात ओबीसीसाठी स्वतंत्र घरकुल योजना कार्यान्वित नसून तळागाळातील बहुतांश लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित आहे. आदिवासी , नवबौद्ध घटकांसाठी घरकुल योजना अस्तित्वात असताना ओबीसीच्या घरकुलासाठी  कोणतीही योजना नसल्याने शासनाने ओबीसी साठी स्वंतत्र योजना राबविण्याची मागणी होत आहे. याबाबत आमदार वानखडे यांनी विधानसभा अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे ओबीसीसाठी स्वंतत्र घरकुल योजना राबविणाच्या मागणी केली होती. त्यांच्या औचित्याच्या मागणीला मा मंत्री इतर मागासवर्ग कल्याण विभाग यांनी दिनांक 10 नोव्हेंबर 2020 च्या पत्रांवये लेखी उत्तर दिले यात ओबीसी प्रवर्गातील लोकांना घरकुल लाभ देण्याबाबत योजना शासनाच्या विचाराधीन असल्याचे नमूद आहे.

अधिक व्हीडिओ पहा

MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

नक्की वाचा (Must Read)

    #अधिक वाचा –Read More#

    नक्की वाचा (Must Read)

    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या