पालकमंत्र्यांनी सोडविले आशावर्कर यांचे उपोषण



पालकमंत्र्यांनी सोडविले आशावर्कर यांचे उपोषण

यावेळी दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांची उपस्थिती.

अमरावती

कोरोना महामारीच्या काळात अमरावती महापालिका क्षेत्रात कार्यरत आशावर्करांचे भीम ब्रिगेडच्या नेतृत्वात गत सात दिवसापासून जिल्हा कचेरीसमोर सुरू असलेले बेमुदत उपोषण महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी उपोषणस्थळी भेट व आश्वासन देऊन सोमवारी (ता. १२) सोडविले. मनपा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या २५२ आशावर्कर यांना अंगणवाडी  सेविकाप्रमाणे ९ हजार रुपये मानधन देण्यात यावे, कोरोना महामारीच्या काळात प्रोत्साहन भत्ता म्हणून दरदिवसाला ३०० रुपये देण्यात यावे, सन २०१९ पासून आयुष्यमान व इंद्रधनुष्य मोहिमेतील थकीत मानधन मिळावे या मागण्या घेवून गत सात दिवसांपासून जिल्हा कचेरीसमोर आशावर्कर बेमुदत उपोषणाला बसल्या होत्या. उपोषणार्थी आशावर्कर यांच्या आंदोलनाची दखल पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी घेतली.

आंदोलनस्थळी भेट देवून सकारात्मक चर्चा करुन मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषणार्थी राजेश वानखडे यांच्यासह आशावर्कर यांना निंबूपाणी पाजून उपोषण सोडले.

यावेळी दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे, हरिभाऊ मोहोड, साची फाऊंडेशनचे जगदीश गोवर्धन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे निमंत्रक समाधान वानखडे , गजानन वानखडे , सिध्दार्थ वानखडे, भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे , प्रदेशाध्यक्ष अशोक नंदागवळी , शहराध्यक्ष उमेश दयुर्योधन , प्रवीण मोहोड , विक्रम तसरे , नितिन काळे ,अमोल खंडारे , रुपेश तायडे , ऋषिकेश उके , सुशिल चौरपगार , अंकुश आठवले , महेंद्र गायकवाड , ऋषिकेश गायकवाड , राजेश भटकर , सचिन नवाडे , अविनाश जाधव , शेख इर्शाद , शरद वाकोडे , आदेश गायकवाड यांच्यासह बहुसख्य आशावकर यावेळी उपस्थित होते.

MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

नक्की वाचा (Must Read)


अधिक वाचा –Read More

नक्की वाचा (Must Read)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या