जुने अतिक्रम कायम करण्यात नगर पालिकेची टाळाटाळ
सामान्य गरीब नागरीकांना न्याय देण्यात
पालिकेचे अपयश: आ. बळवंत वानखडे
Daryapur Banosa - बाभळी या भागात गेल्या ३५ वर्षापासून
गरीब जनता रहिवासी आहे, या लोकांनी अनेकवेळा पालिकेत आपली कैफियत मांडत न्यायाची याचना
केली, मात्र राजकीय मतांची मांडणी डोळ्यापुढे ठेवत आजवर या गरीब नागरिकांना न्याय देण्यास
टाळले, यामुळे दर्यापुर शहरातील अनेक परिवार घरकुल योजनेपासून दूर राहिले आहेत. असा
आरोप आ.बळवंत वानखडे यांनी केला आहे. विधान भवनात मतदारसंघातील अडचणीचा आढावा घेताना
आ.बळवंत वानखडे यांनी शासनाच्या पुढे हि बाब मांडली.
दर्यापुर नगर पालिका हद्दीत राहणाऱ्या गरीब नागरिकांना शासनाने घरकुल योजना राबवित हक्काचे घर देण्याचा संकल्प केला आहे. मात्र त्यास छेद देण्याचे काम आजवर नगर पालिके त प्रशासनाच्या वतीने झाले आहे . मागील काळात यापैकी काही झोपड्या नियमानुल केल्या आहेत. मात्र आजही अनेक जण वंचित आहेत.
दर्यापुर शहराचे तिन भाग दर्यापुर - बनोसा आणि बाभळी असे भाग आहेत. यातील केवळ काही लोकांचे अतिक्रमण नियमानुकूल झाले आहे. दर्यापुर पालिकेत घरकुल लाभार्थ्य करीता करोड़ो रुपयांचा निधि शासनाकडून आला आहे. काही लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे, तर मोठ्या प्रमाणात असलेल्या लोकानां आजही लाभ मिळाला नसल्याचे वास्तव आहे. राजकीय पोळी भाजुन घेण्याच्या नादात गेल्या ३५ वर्षापासून अतिक्रमित जागेत राहणाऱ्या नागरीकांवर अन्याय होत असल्याची बाब आ. बलवंत वानखडे यानी शासनाच्या समोर मांडली, हे लोक घरकुल योजनेपासून आजही वंचित असून त्यांचे जुने अतिक्रमण नियमानुकूल करन्यात यावे अशी मागणी आ.बळवंत वानखडे यानी विधानसभेत केली आहे.
MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर
नक्की वाचा (Must Read)
नक्की वाचा (Must Read)
- संजय गांधी निराधार योजना तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी तपशिल पहा
- अटल पेन्शन योजना तपशिल पहा
- आंतरजातीय विवाह योजना तपशिल पहा
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना तपशिल पहा
- पंतप्रधान सुरक्षा विमा योजना तपशिल पहा
- घरगुती कामगार योजना तपशिल पहा
- आयुष्मान भारत योजना तपशिल पहा
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तपशिल पहा
- प्रधान मंत्री उज्ज्वला योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना तपशिल पहा
- ई-शिष्यवृत्ती तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- प्रधानमंत्री किसान सम्मान योजने अंतर्गत लाभ प्राप्त शेतकरी यांची यादी तपशिल पहा
- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
नक्की वाचा (Must Read)
0 टिप्पण्या