आमदार बळवंत वानखडे सह कृषी अधिकारी यांनी कली बोंड अळी पाहणी

 

आमदार बळवंत वानखडे सह कृषी अधिकारी यांनी कली बोंड अळी पाहणी

दर्यापूर दि .३ 

अंजनगाव दर्यापूर तसेच कृषी अधिकारी यांनी शेताच्या बांधावर जाऊन केली बोंड अळीची पाहणी केली . बोड अळीने शेतकर्याचा केला घात . अंजनगाव दर्यापूर तालुक्यातील शेतकरी आधी कोरणा - या महामारी संकटाने पूर्णपणे खाचून गेला होता . तदनंतर मुंग उडीद , सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातापाया मध्ये एक अमृत टॉनिक म्हणून होते . 

परंतु निसर्गाच्या अवकृपेने त्या पिकावर मुंग . उडीद सोयाबीन एलो रोगाने पूर्णपणे शेतकऱ्यांचा घात केला आहे .परंतु निसर्गाच्या अवकृपेने त्या पिकावर मुंग . उडीद सोयाबीन एलो रोगाने पूर्णपणे शेतकऱ्यांचा घात केला आहे . त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदील होऊन गेला . अंजनगाव दर्यापूर तालुक्यामध्ये कपाशी जास्त पेरणी असून एक वेचा सुद्धा काढला नाही . तर कपाशी वर मोठ्या प्रमाणात बोड अळीने घात केला आहे . त्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचून गेला त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची वेळ निर्माण झाली आहे तरी शासनाने या गोष्टीचा विचार न करता लवकरात लवकर मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी आमदाराकडे करीत आहेत . यासाठी आमदार यांनी हा प्राशन निकाली कळावे . 

या पाहणीसाठी दर्यापूर तहसीलदार डॉ . योगेश देशमुख . प्रादेशिक संशोधन अधिकारी केंद्रप्रमुख डॉ.अनिल ठाकरे . तालुका कृषी अधिकारी राजकुमार आडोकार . डॉ . धावडे किटकनाशक शास्त्रज्ञ . गजानन चांदूरकर गोपाल गहले गजानन घटाळे संजय कदम . प्रभाकर गहले . तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते डॉ . ठाकरे प्रादेशिक संशोधन केंद्र प्रमुख यांनी कपाशी पिकांची पाहणी करीत असताना . कपाशीचे बोंडे तोडले असता . त्यांनी निरीक्षण केले तेव्हा 50 नबोडसाळ आणि 35 टक्के गुलाबी बोंड अळी . असे एकूण 85 टक्के पीक खराब झाले . असे आमदार बळवंत वानखडे तसेच तालुका दंडाधिकारी योगेश देशमुख व शेतकरी यांना लक्षात आणून दिले . तसेच आता बोंड आळी चा पाचवा सहावा मोसम आहे . आणि ते शेवटपर्यंत राहणार असे सुद्धा त्यांनी सांगितले . 

काही त्यावर उपाय सुद्धा सांगितले परंतु ती उपाय कितपत योग्य ठरतील . हे ठामपणे सांगितले नाही त्यामुळे शेतकरी यांना लवकर मदत जाहीर करावी अशी मागणी दर्यापूर . अंजनगाव सुर्जी शेतकऱ्यांची आहे .


MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

नक्की वाचा (Must Read)

अधिक वाचा –Read More

नक्की वाचा (Must Read)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या