दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील संत गाडगेबाबा सह सूतगिरणी मर्या. दर्यापूर आणि अंबा सहकारी साखर कारखाना , अंजनगाव सूर्जी या दोन्ही सहकारी संस्था पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने विधानभवन मुंबई येथे आढावा बैठक

दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील संत गाडगेबाबा सह सूतगिरणी मर्या. दर्यापूर आणि अंबा सहकारी साखर कारखाना , अंजनगाव सूर्जी या दोन्ही सहकारी संस्था पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने विधानभवन मुंबई येथे मा. मंत्री महोदयांच्या उपस्थितीत आढावा बैठक


आज दिनांक 21/10/2020 रोजी मा. आमदार वानखेडे यांनी  केलेल्या विनंतीनुसार मा ना श्री नानाभाऊ पटोले साहेब विधानसभा अध्यक्ष , महाराष्ट्र , मा ना श्री बाळासाहेब पाटील साहेब , सहकार मंत्री , मा ना श्रीमती यशोमतीताई ठाकूर पालकमंत्री अमरावती जिल्हा , मा ना श्री राजेंद्र पाटील यड्रवकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील संत गाडगेबाबा सह सूतगिरणी मर्या. दर्यापूर आणि अंबा सहकारी साखर कारखाना , अंजनगाव सूर्जी या दोन्ही सहकारी संस्था पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने विधानभवन मुंबई येथे आढावा बैठक पार पडली. 
दर्यापूर विधानसभा मतदारसंघात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे. तसेच अंजनगाव तालुक्यात सिंचनाचे पाणी उपलब्ध आहे. संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणी ही सन 2007 पासून बंद आहे. सदर सूतगिरणी पूर्ववत सुरू झाल्यास त्याचा फ़ायदा मतदारसंघातील शेतकाऱ्याना होऊन रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे त्याचप्रमाणे अंबा साखर करण्याची स्थिती आहे. 


दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या बँकेने अंबा साखर कारखाना कायनेटिक पेट्रोलियम कंपनी चेंबूर या कंपनीस कारखाना पूर्ववत सुरू करण्याच्या अटीवर विकला. परंतु सदर कंपनीमार्फत कारखाना बंद अवस्थेत ठेवला. सदर कारखाना पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने एक महिन्यात अहवाल सादर करायचे निर्देश मा ना श्री नानाभाऊ पटोले यांनी दिले. तसेच संत गाडगेबाबा सूतगिरणी दर्यापूर पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने वस्त्रोद्योग विभाग व दि महाराष्ट्र सहकारी बँक यांच्या सहकार्याने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. 
तसेच खरेदी विक्रीचे कमिशनचे पैसे आणि अन्य प्रलंबित देयके तातडीने अदा करण्याबाबत मागणी केली. शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी विक्री संस्थेद्वारे खरेदी करण्यात यावा अन्य कुठल्याही संस्थेला खरेदीचे अधिकार देऊ नये याबाबत मागणी केली. या बैठकीस प्रधान सचिव सहकार , प्रधान सचिव वस्त्रोद्योग , आयुक्त पणन , आयुक्त साखर , एम एच बँकेचे प्रतिनिधी  ,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आदी अधिकारी उपस्थित होते.


MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

नक्की वाचा (Must Read)

अधिक वाचा –Read More

नक्की वाचा (Must Read)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या