संत गाडगे बाबा सूतगिरणी व अंबा साखर कारखाना लवकरात लवकर सुरु करा
आमदार बळवंत वानखडे यांचे अथक प्रयत्न सुरु ; बैठक आयोजित करून मांडला मुद्दा
दर्यापूर :-
दर्यापूरची संत गाडगे बाबा सूतगिरणी २००७ पासून बंद आहे. या सूतगिरणीवर कोट्यवधी रुपयांचे राज्य सहकारी बँक (एमएस बँक)चे कर्ज आहे. त्यामुळे बँकेने या सूतगिरणीला सील लावले आहे. गेल्या 13 वर्षांपासून ७०० कामगारांचा रोजगार यामुळे बंद पडला आहे. काहींनी दुसरा रोजगार शोधला, तर अनेकांवर उपासमारीची पाळी आली असून ज्या कामगारांनी आयुष्यभर या सूतगिरणीत काम केले. ते कामगार सूतगिरणी सुरूहोईल, या भाबड्या आशेने चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहेत.
आमदार बळवंत वानखडे यांनी केलेल्या विनंतीनुसार मा.ना.श्री नानाभाऊ पटोले विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, मा.ना.श्री बाळासाहेब पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य, मा.ना श्रीमती यशोमतीताई ठाकूर पालकमंत्री अमरावती जिल्हा, मा.ना श्री राजेंद्र पाटील यड्रवकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील संत गाडगेबाबा सह सूतगिरणी मर्या. दर्यापूर आणि अंबा सहकारी साखर कारखाना अंजनगाव सूर्जी या दोन्ही सहकारी संस्था पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने विधानभवन मुंबई येथे आढावा बैठक पार पडली.
दर्यापूर विधानसभा मतदारसंघात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे. तसेच अंजनगाव तालुक्यात सिंचनाचे पाणी उपलब्ध आहे. संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणी ही सन 2007 पासून बंद आहे. सदर सूतगिरणी पूर्ववत सुरू झाल्यास त्याचा फायदा मतदारसंघातील शेतकऱ्यांना होऊन रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे.त्याचप्रमाणे अंबा साखर कारखाण्याची स्थिती आहे. दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या बँकेने अंबा साखर कारखाना कायनेटिक पेट्रोलियम कंपनी चेंबूर या कंपनीस कारखाना पूर्ववत सुरू करण्याच्या अटीवर विकला. परंतु सदर कंपनीमार्फत कारखाना बंद अवस्थेत ठेवला. सदर कारखाना पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने एक महिन्यात अहवाल सादर करायचे निर्देश मा.ना.श्री नानाभाऊ पटोले यांनी दिले.
संत गाडगेबाबा सूतगिरणी दर्यापूर पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने वस्त्रोद्योग विभाग व दि.महाराष्ट्र सहकारी बँक यांच्या सहकार्याने कार्यवाही करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.तसेच खरेदी विक्रीचे कमिशनचे पैसे आणि अन्य प्रलंबित देयके तातडीने अदा करण्याबाबत मागणी केली. शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी विक्री संस्थेद्वारे खरेदी करण्यात यावा अन्य कुठल्याही संस्थेला खरेदीचे अधिकार देऊ नये अशी मागणी बैठकीत करण्यात आली.या बैठकीस प्रधान सचिव सहकार, प्रधान सचिव वस्त्रोद्योग, आयुक्त पणन, आयुक्त साखर, एम एच बँकेचे प्रतिनिधी ,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आदी अधिकारी उपस्थित होते.
MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर
नक्की वाचा (Must Read)
- माजिप्राच्या विरोधातील आ. बळवंत वानखडे यांच्या मध्यस्तीने ग्रामस्थांच्या अडचणी सोडवण्याची दिले आस्वासन.
अधिक वाचा –Read More
नक्की वाचा (Must Read)
- संजय गांधी निराधार योजना तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी तपशिल पहा
- अटल पेन्शन योजना तपशिल पहा
- आंतरजातीय विवाह योजना तपशिल पहा
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना तपशिल पहा
- पंतप्रधान सुरक्षा विमा योजना तपशिल पहा
- घरगुती कामगार योजना तपशिल पहा
- आयुष्मान भारत योजना तपशिल पहा
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तपशिल पहा
- प्रधान मंत्री उज्ज्वला योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना तपशिल पहा
- ई-शिष्यवृत्ती तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- प्रधानमंत्री किसान सम्मान योजने अंतर्गत लाभ प्राप्त शेतकरी यांची यादी तपशिल पहा
- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
नक्की वाचा (Must Read)
0 टिप्पण्या