मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्येविषयी व इतर विविध समस्येविषयी मा. कृषिमंत्री भुसे साहेब यांच्याशी चर्चा करतांना आमदार बळवंत वानखडे

मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्येविषयी व इतर विविध समस्येविषयी मा. कृषिमंत्री भुसे साहेब यांच्याशी चर्चा करतांना आमदार बळवंत वानखडे


दर्यापूर : दि. 21

 परतीच्या व सततच्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन , कापूस , मुंग , उडीद व अन्य फळबाग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे. झालेल्या नुकसानाची सर्वेक्षण करून भरीव नुकसानभरपाई देणेबाबत मा. कृषिमंत्री भुसे साहेब यांच्याशी दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांनी मागणी केली.

 तालुका क्रीडा संकुल , अंजनगाव सूर्जी चे ज्या जागेवर बांधकाम करायचे आहे. ती नियोजित जागा कृषी खात्याची असून न. प. अंजनगाव सूर्जी ने सदर जागा क्रीडा संकुलसाठी आरक्षित केली आहे. या जागेच्या ताबा मिळण्यासाठी कृषी विभागाची नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यक आहे. सदर क्रीडा संकुलाचे बांधकामाचा प्रस्ताव शासनास सादर करण्यासाठी कृषी विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यात यावे याबाबत मागणी केली .

तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेळी खरेदीची प्रक्रिया कोविड -19 च्या प्रादुर्भावाच्या काळात थांबवण्यात आली आहे. शेळी खरेदीसाठी पूर्वसमंती मिळालेल्या 131 लाभार्थ्यांना तातडीने खरेदी करण्याची परवानगी देण्याची मागणी यावेळी केली.

MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

नक्की वाचा (Must Read)

अधिक वाचा –Read More

नक्की वाचा (Must Read)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या