Pradhan mantri jeevan jyoti Bima Yojana

पंतप्रधान जीवन ज्योती विमा

पंतप्रधान जीवन ज्योती योजने अंतर्गत अपघातात मृत्यू पावल्यानंतर सुरक्षा दिली जाते. 

ठळक वैशिष्टे 

Pradhan mantri jeevan jyoti Bima Yojana

  • 1. रुपये ३३० वार्षिक हप्ता 
  • 2. लाभार्थी वयोगट १८ ते ५० 
  • 3. लाभ - मृत्यू झाल्यास २ लाख रुपये भरपाई 
  • 4. अट - फक्त बँकेत खाते असणे आवश्यक कोणीही लाभ घेवू शकतो 
    • एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी हि एक आयुर्विमा योजना आहे. दर वर्षी नूतनीकरण आवश्यक. बँका व भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहयोगाने या योजनेचे परिचालन केले जाईल 
    • १८ ते ५० वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील. एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एका बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकेल. विमा उतरविणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूत मानला जाईल 
    • योजनेचा कालावधी दर वर्षी १ जून ते ३१ मे असा राहील व विमा हप्ता बँक खातात परस्पर नावे टाकला जाईल . पुढील वर्षाच्या नूतनीकरणाचा अर्ज ३१ मे पर्यंत देणे आवश्यक राहील . योजनेत सहभागी होण्यासाठीचा काळ सरकार सुरवातीला ३ महिने पर्यंत वाढवू शकते 
    • विमाधारकाचा कुठल्याही कारणाने मृत्यू झाला तर वारसास रु . २ लाख भरपाई मिळेल
    • विमा हप्ता रो . ३३० / - प्रती व्यक्ती प्रती वर्ष राहील व बँक बचत खात्यात परस्पर नावे टाकला जाईल विमा धारकाने वय वर्ष ५५ पूर्ण केल्यावर / बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता नावे टाकण्यास पुरेशी शिल्लक नसेल तर / बँक खाते बंद केले तर विमा संरक्षण संपुष्टात येईल. 
    • तांत्रिक अडचणीमुळे संपुष्टात आलेली विमा पॉलिसी काही अटींची पूर्तता केल्यावर पुन्हा चालू करता येईल.

Pradhan mantri jeevan jyoti Bima Yojana

नक्की वाचा (Must Read)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या