Gharguti kamgar yojana



घरगुती कामगार- योजना

1.      घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे राबविण्यात येणा-या कल्याणकारी योजना
2.      जनश्री विमा योजना
3.      अंत्यविधी सहाय्य
4.      विदेशी भाषा प्रशिक्षण
5.      यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठामार्फत पदविका व पदवी अभ्यासक्र
6.      नवीन योजना

घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे राबविण्यात येणा - या कल्याणकारी योजना

सदर अधिनियमाच्या कलम 10 अन्वये घरेलू कामगारांसाठी पुढील कल्याणकारी योजनांची तरतूद केलेली आहे.अपघात घडल्यास लाभार्थीना तात्काळ सहाय्य पुरविणे, लाभार्थीच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणे, लाभार्थीच्या अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या आजारावर उपचार करण्यासाठी वैदयकीय खर्चाची तरतूद करणे, महिला लाभार्थीकरीता प्रसुती लाभाची तरतूद करणे, लाभार्थीचा मृत्यू झाल्यावर कायदेशीर वारसाला अंत्यविधीच्या खर्चासाठी रक्कम प्रदान करणे. 

मंडळातर्फे देण्यात येणारे लाभ : 

जनश्री विमा योजना

  • घरेलू कामगारांना जनश्री विमा योजना लागू झालेली आहे . सदर योजनेअंतर्गत खालील प्रमाणे लाभ दिले जातात.
  • जनश्री सदस्याचा नैसर्गिक मृत्यु ओढवल्यास त्याच्या वारसदारास रु. 30000 / - देण्यात येते. 
  • अपघाती मृत्यु ओढवल्यास त्याच्या वारसदारस रु. 75,000 / - देण्यात येते. 
  • अपघातामुळे कायम स्वरुपी संपुर्ण अपंगत्व ओढवल्यास सदस्यास रु. 75,000 / - देण्यात येते. 
  • अपघातामुळे कायमस्वरूपी अशत : अपंगत्व आल्यास सभासदास रू. 37,500 / - देण्यात येते.
  • याशिवाय सदस्यांच्या मुलांना शिक्षणाकरिता शिक्षा सहयोग योजने अंतर्गत इयत्ता 9 वी ते 12 वी करिता तसेच आय.टी.आय. चा कोर्स करीत असल्यास , दरवर्षी उर्तीण होत असल्यास , दर तिमाही करिता रु. 300 / - इतकी रक्कम प्रत्येकी (जास्तीत जास्त दोन मुलांकरिता ) देण्यात येते. 
  • भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत एका जनश्री सदस्याचा वारसदारास नैसर्गिक मृत्यूबाबत रू. 30000 / - रक्कम अदा करण्यात आली आहे.

अंत्यविधी सहाय्य 

  • मृत घरेलू कामगाराच्या कायदेशिर वारसास अंत्यविधी सहाय्य रु. 2,000 / - देण्यात येते . त्यानुसार दोन सदस्यांना रक्कम अदा करण्यात आली आहे . मंडळाच्या दि . 07.08.2013 रोजीच्या बैठकीत 12 अर्जाना मान्यता देण्यात आली असुन त्याची एकुण रक्कम रु . 24,000 / - आहे.

  • कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत घरेलू कामगाराला व त्यांच्या पाल्यांना शिकावू उमेदवार प्रशिक्षण व मॉड्यूलर एम्प्लॉएबल स्किम अंतर्गत प्रशिक्षण देण्याचा ठराव करण्यात आलेला आहे . सदर योजना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे राबविण्यात येणार आहे. 

  • तरी संबंधित कार्यालयाशी पत्रव्यवहार चालू आहे . घरेलू कामगार मंडळाच्या दि . 28.09.2012 च्या बैठकीत घरेलू कामगारांना प्रसुतीलाभ देण्याबाबत ठराव करण्यात आला असून त्याअंतर्गत घरेलू कामगारास दोन अपत्यापर्यंत प्रत्येक प्रसुतीकरीता रु .5,000 / - इतकी मदत देण्यात येणार आहे .


MLA Balwant Wankhade 

जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

नक्की वाचा (Must Read)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या