दर्यापूर मतदारसंघातील मुंगाच्या पिकावर आलेल्या 'मोझ्याक' या रोगाच्या प्रादुर्भावाने नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्या
आमदार बळवंतराव वानखडे यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन
दर्यापूर(प्रतिनिधी)-
दर्यापूर मतदारसंघ हा खारपाण पट्यातील भागाचा असल्याने मतदारसंघातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मुंगाच्या पिकाचा पेरा केला आहे.पण या मुंगाचे पीकाचे 'मोझ्याक' या रोगाच्या प्रादुर्भावाने नुकसान झाल्याने याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. आहे.तरी दर्यापूर मतदारसंघातील मुंगाच्या पिकावर आलेल्या मोझ्याक या रोगाच्या प्रादुर्भावाने नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंतराव वानखडे यांनी अमरावती जिल्हाधिकारी यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.या निवेदनाची प्रतिलिपी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,अमरावती व उपविभागीय अधिकारी,दर्यापूर आणि उपविभागीय कृषी अधिकारी अचलपूर यांना दिली आहे.
3 टिप्पण्या
आपला आणि आपल्या हक्काचा आमदार
उत्तर द्याहटवाआपला आणि आपल्या हक्काचा आमदार
उत्तर द्याहटवाआपला आणि आपल्या हक्काचा आमदार
उत्तर द्याहटवा