आ.बळवंतराव वानखडे यांच्या मार्गदर्शनात,तहसीलदार, प्रमोद पाटील दाळू, विश्वनाथ घुगे यांच्या हस्ते वितरण
अंजनगाव-मागील वर्षी अंजनगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे,वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांना फटका बसला होता. त्यामुळे अनेक लोकांच्या घरांचे नुकसान झाले. घराची पडझड झालेल्याची तेव्हा आमदार बळवंतराव वानखडे यांच्या निर्देशाने प्रशासनास पंचनामे करण्याचे आदेशीत करण्यात आले होते. त्या नागरिकांना आज दि.24 जुलै रोजी आमदार बळवंतराव वानखडे यांच्या मार्गदर्शनात अंजनगावचे तहसीलदार विश्वनाथ घुगे यांच्या हस्ते घरांच्या मदतीचे आर्थिक चेक वाटप करण्यात आले.
यावेळी अंजनगाव तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद पाटील दाळू, शहराध्यक्ष प्रदीप देशमुख, नितेश वानखडे,आमदार बळवंतराव वानखडे याचे ,स्वीय सहाय्यक दीक्षांत पाटील, खाजगी सहाय्यक रितेश देशमुख ,कैलास सिरसाट, वैभव वाकोडे आदी उपस्थित होते.
2 टिप्पण्या
गोर गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर आमदार
उत्तर द्याहटवा👍
हटवा