बोगस बियाने पुरवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल होणार-

बोगस बियाने पुरवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल होणार-

आमदार बळवंत वानखडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश - शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केली पाहणी

अंजनगाव सुर्जी तालुक्यात गेल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला आणि शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याची पेरणी केली. परंतु अंजनगाव सुर्जी तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांना बियाणे उगवलेच नसल्याने अशा बोगस बियाणे पुरवणारे बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार यावे असे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केल्यावर आमदार बळवंत वानखडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आदेश देवून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करण्याचे आदेश ही देण्यात आले.

तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतात पेरणीला सुरुवात केली. गेल्यावर्षी सतत पावसामुळे सोयाबीन ओले असल्यामुळे शेतकऱ्यांनी कंपनीचे बियाणे घेण्यास पसंती दर्शविली. त्यामुळे कृषी सेवा केंद्रातून मोठ्या प्रमाणात खाजगी कंपन्यांच्या बियाण्यांची विक्री झाली. पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी ही केली परंतु पाच-सहा दिवस उलटले  तरीही बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांनी ओरड करायला सुरुवात केली. तशा तक्रारी ही प.स. कृषी अधिकारी यांच्या कडे केल्या. त्यावर आज दिनांक 21 ला आमदार बळवंत वानखडे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या  शेतात जाऊन पाहणी केली आणि बोगस बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करा उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी तालुका तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष, प्रभारी उपयोग उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुलं सातव, कृषी संशोधन केंद्र अचलपूरचे वैज्ञानिक एन.के.पतके, महाबीज अधिकारी संजय देशमुख, तालुका कृषी अधिकारी मनोहर कोरे, प.स. कृषी अधिकारी अश्विन राठोड, प.स. सभापती प्रियंकाताई दाळू, उपसभापती महेश खाराडे, काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रमोद दाळू, सरपंच संघटनेचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, प्रदिप निमकाळे, वैभव खारोटे, विठ्ठल ढोले, सागर साबळे, सातेगाव, घोगर्डा सह मोठ्या प्रमाणात येथील शेतकरी उपस्थित होते. यावेळी तक्रार निवारण समिती तालुक्यातील शेतकर्‍यांच्या तक्रारी प्राप्त आहे त्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तक्रारी द्याव्यात असे अधिकाऱ्यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या