महालोककवी वामनदादा कर्डक यांच्या वारसदारांना आमदार बळवंत वानखडे देणार मदतीचा हात


महा लोककवी वामनदादा कर्डक यांच्या वारसदारांना आमदार बळवंत वानखडे देणार मदतीचा हात - पावसाळी अधिवेशनात सदनिकेचा मुद्दा मांडणार

अमरावती-  

महाराष्ट्राचे लोककवी वामनदादा कर्डक ज्यांनी आपली हयात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याकरिता घालवीले आहेत.

आपल्या गायनाच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ जनसामान्यात रुजविली मात्र त्यांचा एकमेव वारसदार रवींद्र वामनदादा कर्डक यांना राहण्याकरिता स्वतःचे घरी नाही. विदर्भ मतदारांनी रवींद्र कर्डक यांच्याशी बातचीत करीत सत्य परिस्थिती जगासमोर आणली याची दखल आमदार बळवंत वानखडे यांनी घेतली असून कर्डक यांच्या वारसदारांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे.

महालोककवी वामनदादा कर्डक यांना तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी 3 जानेवारी 2004 रोजी शासकीय कोट्यातून सदनिका व दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली होती

मात्र सदनिकेचा ताबा मिळण्यापूर्वी वामनदादा कर्डक यांचे 15 मे 2004 रोजी निधन झाले त्यानंतर त्यांच्या पत्नी शांताबाई यांच्या नावावर सदनिका हस्तांतर करून देण्यात आली. राज्य सरकारने मान्यता दिली होती. दुर्दैवाने त्यांचे निधन 15 नोव्हेंबर 2008 रोजी झाले. सदनिकेसाठी लागणारी रक्कम आर्थिक अडचणीमुळे रवींद्र कर्डक यांना भरता आली नाही. त्यामुळे त्यांना हक्काचे घर मिळू शकले नाही.

दर्यापूर-अंजनगाव मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडे यांनी विदर्भ मतदाराच्या बातमीची दखल घेत कवी वामनदादा कर्डक यांचे एकमेव वारसदार रवींद्र कर्डक यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला. रवींद्र कर्डक यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली. शासकिय सदनिका रविद्र कर्डक यांना मिळावी या करीता सर्वोतापरीने  पाठपुरावा करणार. तसेच येणाऱ्या विधानसभा पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडणार आहे. त्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पाठपुरावा करणार असल्याची माहिती वानखडे यांनी विदर्भ मतदारला दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या