श्रीक्षेत्र ऋणमोचन विकास कामांना होणार प्रारंभ


श्री संत गाडगे महाराज यांचे प्रथम कर्मभूमी असलेले पूर्णा नदीच्या तीरावरील श्री क्षेत्र ऋणमोचन तालुका दर्यापूरचा सर्वांगीण विकास होणार असून त्याकरिता शासनाच्या वतीने सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या असून लवकरच कामाचा प्रारंभ होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांनी सांगितले. ते श्रीश्रेत्र ऋणमोचन येथे परिसराची पाहणी करतांना बोलत होते. 

आमदार बळवंत वानखडे यांच्या समवेत सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा क्रमांक 5 दर्यापूरचे तहसिलदार योगेश देशमुख, शाखा अभियंता वाय बी काकड, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आशीष राऊत, उपविभागीय सहाय्यक व्ही.बी. बोगटे, नुर खा पठाण तसेच श्री क्षेत्र ऋणमोचन गाडगे महाराज लक्ष्मी नारायण संस्थांचे प्रतिनिधी शरद पाटील वानखेडे वसंतराव देशमुख, सागर देशमुख आदींनी परिसर पाहणी करून सर्वांगिन विकास कसा होणार याची माहिती उपविभागीरय अधिकारी एस.एन. देशमुख यांनी दिली. गाडगेबाबांनी उभारलेल्या काही वास्तू तसाच ठेवून त्यांचे सौदर्यीकरण भैव्य दिव्य किर्तन हॉल पूर्णा नदीपात्रालगत कॉग्रटींग रोड, तसेच विकासात्मक कामे घेण्यात येणार आहेत. आता खाऱ्या अर्थाने श्री क्षेत्र ऋणमोचन आमल्याचा विकास होणार असल्याने गाडगेबाबांच्या समवेत काम करणारे स्व. अ.बु. उर्फ दादासाहेब देशमुख यांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे बापूसाहेब देशमुख यांनी सांगितले. आमदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत या श्री श्रेत्राचा विकास होणार, असेही बापूसाहेब म्हनाले. त्याप्रसंगी तेथील सेवक रामभाऊ मोरे यांचा बळवंत वानखडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या