सूर्य आग ओकू लागला असून उन्हाचे चांगलेच चटके जाणवत आहे. त्यात कोरोना महामारी मुळे नागरिक सद्या हैराण झाले आहेत. शेतकरी सध्या आर्थिक संकटात असून त्यात अशा घटना घडत आहेत. रविवारी दुपारी भर दुपारी लागलेल्या आगीने वानखडे यांचे चांगलेच नुकसान झाले. या आगीत शेती उपयोगी सर्वच साहित्य, जनावारांचे कुटार, रहिवाशी असलेल्या आदिवासी कुटूंबाचे साहित्य, पैसे व मुलांच्या शिक्षणाची कागदपत्रे जळून खाक झाले. विशेष म्हणजे दहा मिनिटांपूर्वी तेथील जनावरे सोडण्यात आली होती. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. याबाबत माहिती आमदार बळवंत वानखडे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन विज वितरण कंपनीचे सहाय्य अभियंता, महसूल विभाग, कृषी विभाग यांच्या सोबत संपर्क करून त्यांना लवकरात लवकर मदत देण्याचे आदेश दिले. तर पंचायत समितीच्या सभापती प्रियांका दाळू यांनी पाहणी करून तहसीलदार यांना माहिती देऊन लवकर मदत देण्याची मागणी केली. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रमोद दाळू, सरपंच सेवा संघाचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे युवा, उद्योजक विजय तिजारे, निलेश घोडेराव विजय बोचरे, राम काळेमेघ मंडळ अधिकारी तलाठी सचिव उपस्थित होते.
आगग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या- आमदार बळवंत वानखडे
अंजनगावसुर्जी तालुक्यातील निमखेड बाजार शेत शिवारात तारीख 24 वासुदेव वानखडे यांच्या शेतात शॉर्ट सरकिट झाल्याने आग
लागली होती. आगीचे तांडव वाढत असताना शेजारी असलेले पंजाबराव गिऱ्हे यांच्या शेतात
वाढत असल्याने दोघांच्याही शेतातील शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडत होती.
त्याची माहिती मिळताच आमदार बळवंत वानखडे व पंचायत समितीच्या सभापती प्रियांका दाळू
यांनी भेट देऊन घटणास्थळी पाहणी केली.
0 टिप्पण्या