मतदारसंघातील पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत आढावा बैठक



मतदारसंघातील पाणीपुरवठ्यासह विविध समस्येबाबत मुंबई येथील आढावा बैठकित चर्चा करतांना -  आमदार  Balwant wankhade


आज दि. ८ ऑक्टोंबर ना श्री गुलाबराव पाटील साहेब , पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री , यांच्या अध्यक्षतेखाली व मा ना श्रीमती यशोमतीताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्तीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत मतदारसंघातील पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत आढावा बैठक पार पडली. दर्यापूर आणि अंजनगाव सूर्जी तालुक्यात शहानुर धरणावरून 156 गावे व 2 शहरे या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होतो. यंदा सरासरी पाऊस झाल्यामूळे धरणात पाणीसाठा उपलब्ध आहे परंतु मजीप्रा च्या आणि पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मच्याऱ्याच्या मनमानी कारभारामुळे दोन्ही तालुक्यात पाणीपुरवठा सुरळीत होत नसून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत असतात त्या अनुषंगाने पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करायची विनंती मा मंत्री महोदयास केली.वारंवार केलेल्या पाठपुराव्याने प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या बळकटीकरनाच्या कामास प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे या बळकटीकरनाचे काम तातडीने सुरू करणेबाबत मागणी केली. जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाक्या पुन्हा बांधण्याबाबत मागणी केली. तसेच मजीप्रा अंतर्गत रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत मागणी केली . सदर बैठकीस मा बबलुभाऊ देशमुख , अध्यक्ष जि प अमरावती , मा वीरेंद्रभाऊ जगताप माजी आमदार , अपर मुख्य सचिव , पाणीपुरवठा व स्वछता विभाग , सचिव , मदत व पुनर्वसन आदी पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.



MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

नक्की वाचा (Must Read)

अधिक वाचा –Read More

नक्की वाचा (Must Read)



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या