माजिप्राच्या विरोधातील आ. बळवंत वानखडे यांच्या मध्यस्तीने ग्रामस्थांच्या अडचणी सोडवण्याची दिले आस्वासन.

 

माजिप्राच्या विरोधातील आ. बळवंत वानखडे यांच्या मध्यस्तीने ग्रामस्थांच्या अडचणी सोडवण्याची दिले आस्वासन.

अंजनगाव सुर्जी - 

    तालुक्यातील भंडारज व परिसरातील गावांमध्ये पाणीपुरवठ्याची नेहमीत अडचण होत असल्याने माजिप्रला वेळोवेळी निवेदने देऊन सुध्दा अडचण सोडविण्याऐवजी नियमित माजिप्र चे अधिकारी दुर्लक्ष करित असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सागर हुरबडे यांनी दोन दिवसांपूर्वी निवेदन देऊन प्रश्न मार्गी न लागल्यास शोले स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार आज दि. 7 ऑक्टोंबर रोजी सकाळी भंडारज येथिल प्राधिकरणाच्या पाणी टाकीवर सागर हुरबडे व सहकारी ठाण मांडून बसले होते. यांची माहिती आमदार बळवंतभाऊ वानखेडे यांना मिळाल्याबरोबर भंडारज गाठुन आंदोलनकर्ते व परिसरातील नागरिकांच्या अडचणी ऐकुन घेतल्या तसेच टाकीवर चढुन आंदोलनकर्तेन सोबत मोबाईल वर संपर्क साधुन अडचण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्याचे आश्वासन दिले व शाखा अभियंता शेंडे सोबत फोन वर संपर्क साधुन या भागातील पाणीपुरवठा संबंधित अडचण पुढील आठवड्याभरात सोडुन याभागात आठ दिवसा ऐवजी तीन दिवसा आड पाणीपुरवठा करण्यात यावा असे आश्वासन अभियंता शेंडे यांनी आमदारांच्या मध्यस्थीने दिले. 

आमदार बळवंतभाऊ वानखेडे च्या मध्यस्थी ने अडचण सोडवण्याचे आश्वासन मिळाल्याने सागर हुरबडे व सहकार्य नी टाकीवरून खाली उतरून आंदोलन मागे घेतले. पाण्याच्या टाकीवर चढुन आंदोलनकर्त्यांन मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सागर हुरबडे यांच्यासह सत्यपाल धुमाळे, निलेश चोपडे, मयुर गिते , पप्पु ढोक , विजय मुकुनु वृषभ धुमाळे होते तसेच यावेळी आमदार बळवंतभाऊ वानखेडे , सभापती प्रियंका दाळु , रा . काँ . चे जिल्हा सरचिटणीस प्रशांत ठाकरे , कांग्रेस कमेटी तालुकाध्यक्ष प्रमोदपाटील दाळु , रा . का . तालुकार्याध्यक्ष संजय चोपडे , राजेंद्र बारब्दे , रा . का . युवानेते सागर साबळे , नंदकिशोर रेखाते , बबलुपाटील काळमेघ , सुधाकर पा . खारोडे , नाना पा . गीते , सुभाष खडसे , रा . म . कांग्रेस च्या साधना कोकाटे , स्मिता घोगरे , मीना कोल्हे , वैभव खारोडे , विठ्ठल ढोले , अनिल आलोकार , कैलास गिते , बबलु पा . निचळ , सुभाष गिते , सुनिल राक्षेसकर , उमेश मंगळे , महेश ढोक , राजेश ढोक तसेच बरेच नागरीक उपस्थित होते.

MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

नक्की वाचा (Must Read)

अधिक वाचा –Read More

नक्की वाचा (Must Read)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या