पांढरी ते वाघडोह रस्त्यावर भरघोस निधी मंजूर करून लवकरच पंधरा वर्षांपासून असलेली ग्रामस्थांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे- आमदार बळवंतराव वानखडे

पांढरी ते वाघडोह रस्त्यावर भरघोस निधी मंजूर करून लवकरच पंधरा वर्षांपासून असलेली ग्रामस्थांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे बळवंतराव वानखडे आमदार दर्यापूर मतदारसंघ. 


साडेआठ कि.मी.च्या रस्त्यासाठी १५ वर्षांपासून लढताहेत ग्रामस्थ ! आ.बळवंत वानखडे यांना निवेदन देऊन घातले साकडे 

पथ्रोट-
पांढरी ते बाघडोह रस्ता मागील १५ वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. सत्याची अवस्था बिकट झाल्याने चारचाकी वाहनच नव्हे तर मोटरसायकलसुद्धा चालवताना वाहनचालकांना समस्यांना सामोरे जावे लागत. या पाढरी ते चापडोह रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी आमदार, खासदारांसह अन्य लोकप्रतिनिधीना नागरिक भेटून ही निकडीची बाब त्यांच्या निर्दशनास आणून देत आहेत. तरीसुद्धा आजपर्यंत या रस्त्यासाठी निधी मंजूर केला गेला नाही, या साडेआठ किलामीटर अंतराच्या रस्त्यासाठी १५ वर्षांपासून येथील ग्रामस्थ लढताहेत अशी व्यथा बाघडोहचे ग्रामस्थ तरुण पाटिल काकड यांनी दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंतराव वानखडे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे व्यथा मांडली.
गावावरून वाघडोहमार्गे शहानूर धरणापर्यंत जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. पांढरी, रामापूर, पथ्रोट परिसरातील काही शेतकऱ्यांची शेती या शहानूर रस्त्यावर असल्याने अनेक शेतक-यांना त्यांचा शेतमाल घरी आणण्यासाठी अत्यंत त्रास सहन करावा लागतो. अनेक अडचणीवर मात करून शेतक - यांना शेतमाल आणण्यासाठी मालवाहतूक गाडीवाल्यांना दुप्पट भाडे द्यावे लागते. साधी गाडी तर या रस्त्याने जाऊसुद्धा शकत नाही. त्यामुळे मजुरसुद्धा शेतात काम करण्यासाठी मिळत नाहीत. येथील ग्रामस्थांचा अंजनगावसुर्जी, पथ्रोट येथील बाजारपेठेशी संपर्क असल्याने तेथे ये-जा करण्यासाठी या रस्त्याशिवाय पर्याय नाही.

एखाद्यावेळी ऐनवेळेवर शहानूर आणि लगत असलेल्या वाघडोह, रायपूर , मलकापूर येथील एखाद्या ग्रामस्थांची अचानक तब्येत बिघडली तर रस्ता खराब असल्याने त्याला रुग्णालयात नेण्यासाठी वाहनहीं मिळत नाही. यामुळे येथील आदिवासी ग्रामस्थांना गावातच घरगुती उपचार नाईलाजाने करून घ्यावा लागता, पण तरीही या रस्त्याच्या कामाकडे आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष गेले नाही. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची रुंदीदेखील कमी 

पांढरी ते बाघडोह हा रस्ता दर्यापूर मतदारसंघात येत असल्याने तत्कालीन आमदारांनी याकडे दुर्लक्ष केल्याने हा रस्ता १५ वर्षांपासून खराब अवस्थेत आहे . विद्यमान आमदार बळवंतराव वानखडे यांना भेटुन निवेदन तरुण पाटिल काकड रविंद्र पाटील हरणे अचलपूर तालुका काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष प्रशांत गोरले सतिश राऊतयानी निवेदन देवुन गावकऱ्यांच्या वतीने आमदारा समोर व्यथा मांडली.

MLA Balwant Wankhade 

जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या