शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळाने आमदार बळवंत वानखडे यांना संपूर्ण वीज बिल माफ करण्यासंदर्भात दिले निवेदन

शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळाने आमदार बळवंत वानखडे यांना संपूर्ण वीज बिल माफ करण्यासंदर्भात दिले निवेदन

दर्यापूर - jansampark mahiti kendra

    दर्यापूर वीज बिले व थकीत कर्ज संदर्भात दर्यापूर अंजनगाव शेतकरी संघटनेच्या एका शिष्टमंडळाने बळवंत वानखडे यांना भेटून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली व निवेदन दिले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2015 पूर्वी शेतकरी कर्जमाफी योजनेत घेतले नाही तसेच बँकांचे दामदुप्पट व्याज झाल्यामुळे व्याज बँकांनी माफ करण्यास शासनाने भाग पाडावे व शेतकऱ्यांची किमान दोन लाखापर्यंत कर्ज माफ करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. 

    घरगुती वीज बिलाचे फक्त विज बिल आकार द्यावा सध्या वीज बिलामध्ये प्रति युनिट वीज आकार सोडून इतर कर आकारला जातो परिणामी ग्राहकांना प्रतियुनिट तीन रुपये चाळीस पैशाची सात रुपये 50 पैसे होते कोरोणा रोगामुळे जनजीवन ठप्प झाले. या काळातील संपूर्ण वीज बिल माफ करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली या संपूर्ण विषयावर विधानसभेच्या आगामी अधिवेशनात आवाज उठविण्याचे आश्वासन आमदार बळवंत वानखडे यांनी दिले.


आमदार बळवंत वानखडे
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या