राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे आ. बळवंत वानखडे यांना निवेदन
अंजनगाव सुर्जी – Jansampark Mahiti Kendra
तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा अजून पर्यंत लाभ न मिळाल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने याबाबत पाठपुरावा केला असता बँक अधिकारी निबंधक कार्यालयाकडे बोट दाखवत आहेत याबाबत शहानिशा करून पुढाकार घेण्याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून आमदार बळवंत वानखडे यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा अदयापही लाभ मिळालेला नसून काही शेतकऱ्यांनी कर्ज माफी मिळावी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे अर्ज केला होता त्यांना सहायक निबंधकमधून कर्जमाफी झाल्याचे पत्र मिळाले होते परंतु बँकेमध्ये गेले असता संबंधित अधिकारी तुम्हाला कर्जमाफी झाली नसल्याचे सांगत आहेत तसेच नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असून ही शेतकऱ्यांची समस्या मार्गी लावण्याकरिता कर्जमाफी होऊन नवीन कर्ज मिळावे याबाबत आमदार बळवंत वानखेडे यांनी पाठपुरावा करून समस्या सोडवण्यासाठी अंजनगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसने त्यांना निवेदन दिले आहे.
यावेळी रा.यु.कॉ.चे तालुकाध्यक्ष सादरए हुरबडे, शेतकरी प्रकाश खोटरे, नंदाराम मसाने, देविदास निमकाळे, भास्कर सपकाळ, परेश गीते, विलास चोपडे उपस्थित होते.
जनसंपर्क माहिती कार्यालय, दर्यापूर
jansamprk.in
1 टिप्पण्या
न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर आमदार
उत्तर द्याहटवा