तालुक्यातील उमरी
मंदिर येथे सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री संत वियोगी महाराज आश्रम भाविक भक्तांच्या
सहकार्याने पूजनीय श्री संत वियोगी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या गावांमध्ये
महाराजांच्या पदस्पर्शाने गावाचा कायापालट, अनेक चमत्कार व साक्षात्कार लोकांना अनुभवायला
महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात
तीर्थस्थापना व जन्मोत्सव सप्ताहाची सुरूवात श्रीमद भागवत कथा, प्रारंभ करून झाला. प्रवचनकार सुश्री
वर्षा किशोरजी बैतूल मध्ये प्रदेश यांच्या
वाणीतून प्रवचन करण्यात आले. या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील जनतेने सात दिवस घेतला
आहे. जनतेकरिता आरोग्य शिबीर, व्यसनमुक्ती उपचार मार्गदर्शन, वस्तू कर्करोग तपासणी
करून त्यांच्यावर उपचार करून त्यांना औषधांचे वाटप मोफत करण्यात आले, या कार्यक्रमाचे
आयोजन डॉक्टर मंगेश राऊत डॉक्टर पाटील तसेच त्यांच्याकडून करण्यात आले होते, गावातून
शोभायात्रा काढून मंदिरामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी आ. बळवंत वानखडे
व त्यांचे सहकारी यांनी रथयात्रेमध्ये सहभाग घेतला.
0 टिप्पण्या