कपाशीवरील बोंडअळीची पाहणी करून आमदार बळवंत वानखडे यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद

कपाशीवरील बोंडअळीची पाहणी करून आमदार बळवंत वानखडे यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद

आमदार बळवंत वानखडेसह अधिकारी शेताच्या बांधावर

अंजनगाव सुर्जी

यावर्षी अतिवृष्टीमुळे मूग, उडीद सोयाबीन पीक हातातून गेली. आता कपाशीवर बोंडअळीने थैमान घातल्याने शेतकरी मोठ्या आर्थीक संकटात सापडलेला आहे. या नुकसानीची पाहणी करण्याकरीता अंजनगाव, दर्यापूर तालुक्यातील अनेक आ.बळवंत वानखडेंसह अधिकाऱ्यांनी शेताच्या बाधावर कपाशीवर आलेल्या बोंडअळीची पाहणी केली. या नुकसानीचा तत्काळ सर्वे करून अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावे असे निर्देश आ.बळवत वानखडे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

अंजनगाव दर्यापूर तालुक्यामध्ये कपाशीचा पेरा जास्त आहे. अनेकांनी एक वेचासुद्धा काढला नाही. कपाशीवर सध्या मोठ्या प्रमाणात बोंड अळीने त्यात घात केला आहे. त्यामुळे शेतकरी [ पूर्णपणे खचून गेला आहे. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची वेळ निर्माण झाली आहे. तरी शासनाने या गोष्टीचा विचार न करता लवकरात लवकर मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी आमदार बळवंत वानखडे यांचेकडे केली आहे.

यावेळी दर्यापूर तहसीलदार डॉ. योगेश देशमुख , प्रादेशिक संशोधन अधिकारी केंद्रप्रमुख डॉ.अनिल ठाकरे , तालुका कृषी अधिकारी राजकुमार आडोकार , डॉ. धावडे , गजानन चादूरकर , गोपाल गहले , गजानन घटाळे , संजय कदम , प्रभाकर गहले , तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

डॉ. ठाकरे प्रादेशिक संशोधन केंद्र प्रमुख यांनी कपाशी पिकांची पाहणी करीत असताना. कपाशीचे बोंडे तोडले असता. त्यांनी निरीक्षण केल्यानंतर ५० टक्के बोंडसाळ. आणि ३५ टक्के गुलाबी बोंड अळी. असे एकूण ८५ टक्के पीक खराब झाले. 
    असे आमदार बळवंत वानखडे तसेच तालुका कपाशीचे निरीक्षण केल्यानंतर ५० टक्के बोंडसाळ. आणि ३५ टक्के गुलाबी बोंड अळी. असे एकूण ८५ टक्के पीक खराब झालेली आहे. 

MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

नक्की वाचा (Must Read)

अधिक वाचा –Read More

नक्की वाचा (Must Read)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या