दर्यापूर तालुक्यातील 35 हजार पशुंची होणार तपासणी

दर्यापूर तालुक्यातील 35 हजार पशुंची होणार तपासणी

आमदार बळवंत वानखडे यांच्याहस्ते लसीकरण मोहीमेचे उद्घाटन

दर्यापूर

राष्ट्रीय पशूरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तालुक्यात पशुंचे लसीकरण मोहिमेचे उद्घाटन आमदार बळ वंतराव वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले. गायवर्ग व म्हैसवर्ग पशूना लाळखुरात लसीकरण करून कानामध्ये १२ अंकी बिल्ला लावणे व व त्याला क्रमांक देणे असे या योजनेचे स्वरूप आहे. या योजनेचा फायदा तालुक्यातील ३५ हजार पशुंना होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा पशुसंवर्धन सभापती विठ्ठलराव चव्हाण, तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, दर्यापूर पंचायत समिती सभापती नंदिनी धोटे, पशुसंवर्धन सह आयुक्त राजू भोजने , जिल्हा परिषद पशुसंवर्धन उपायुक्त डॉ मोहन गोहणे , जिल्हा पशुधन अधिकारी डॉ . विजय राहाटे आदी उपस्थित होते.

पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व पशुसंवर्धन विभागाला सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी आमदार बळवंतराव वानखडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. वैरण विकास कार्यक्रम अंतर्गत काही निवडक पशुपालकांना त्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक सहाय्यक आयुक्त डॉ.एन. एम.अवघड यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.दिलीप देशमुख डॉ.प्रशांत अस्वार यांनी परिश्रम घतले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या