अंजनगाव सूर्जी येथे पणन चे कापूस खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार

 अंजनगाव सूर्जी येथे पणन चे कापूस खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार आमदार बळवंत वानखडे यांची सहकार व पणन मंत्र्याकडे मागणी 

दर्यापूर आणि अंजनगाव सूर्जी या दोन्ही तालुक्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून सद्यस्थितीत कापूस वेचणीला वेग आला आहे . सोयाबीन मुंग उडीदचे पीक हातून गेल्याने शेतकऱ्यांना कापसाने तारले आहे . बोंडळीने कापसाचे देखील नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे . कसेबसे हाती लागलेल्या कापसाची नोंदणी करून कापूस विकण्याच्या दृष्टीने शासनाचे खरेदी केंद्र सुरू व्हावे यासाठी शेतकऱ्यांकडून सततची मागणी होत आहे . 

याबाबत दर्यापूर आणि अंजनगाव सूर्जी या दोन्ही तालुक्यात पणन चे कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करणेबाबत मा ना श्री बाळासाहेब पाटील मंत्री सहकार व पणन यांची भेट घेऊन याबाबत मागणी दर्यापूर विधानसभा मतदासंघाचे आमदार बळवंत वानखेडे यांनी केली . यावेळी माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप उपस्थित होते .


MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

नक्की वाचा (Must Read)

अधिक वाचा –Read More

नक्की वाचा (Must Read)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या