मा. मंत्री महोदयांकडून मतदारसंघातील विजेच्या समस्येविषयी विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन
दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघ हा ग्रामीण भागातील विभागला असून मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्या आहेत. याबाबत मा. ना. श्री. नितिनजी राऊत साहेब ऊर्जामंत्री यांची मतदारसंघातील विजेच्या समस्येसंबंधी भेट घेतली.
रब्बी हंगामाची सुरवात होत असून शेतकऱ्याचे यंदा झालेले नुकसान पाहता रब्बी पिकांवर शेतकाऱ्यांची दारोमदार आहे. रब्बी पिकाच्या ओलितासाठी मोठ्या प्रमाणावर विजेची मागणी आहे.
मोठ्या प्रमाणावर अतिभारामुळे रोहित्र खराब होत असून अतिरिक्त रोहित्र दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील जास्त प्रमाणात देण्याची मागणी केली. अतिरिक्त जास्त भर क्षमतेचे रोहित्र उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी केली .
तसेच प्रामुख्याने दर्यापूर स्वंतत्र विद्युत विभाग स्थापन करण्याची मागणी करून लेखी पत्र दिले. तसेच मतदारसंघातील आवश्यक असलेल्या उपकेंद्र , उपकेंदांची दर्जावाढ , प्रलंबित कृषी कनेक्शन , अशा विविध मागण्या लेखी पत्राच्या माध्यमातून केल्या. व त्याबाबत मा. मंत्री महोदयांकडून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाले.
यावेळी मा ना श्री विश्वजीत कदम साहेब राज्यमंत्री सहकार व पणन , माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप प्रामुख्याने उपस्थित होते
0 टिप्पण्या