दर्यापूर
नगर परिषदेसह विविध इमारतींचे मा. पालकमंत्र्यांच्याहस्ते
लोकार्पण
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला लोकार्पण सोहळा
दर्यापूर - तालुका प्रतिनिधी पायाभूत सुविधांची अधिकधिक कामे पूर्ण करून विकासाला
गती देण्याचा महाविकास आघाडी शासनाचा प्रयत्न आहे. दर्यापूर शहरात नप इमारतीसह इतर
इमारतींची कामे शहराच्या लौकिकात भर घालणारी असून, येथील उर्वरित कामांसाठी ही सहा
महिन्यात निधी मिळवून देऊ, असे प्रतिपादन पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी दि.
6 ऑक्टोंबर दर्यापूर येथे केले. दर्यापूर येथील नगरपरिषदेची नूतन इमारत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय
व उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटन व जि.प. विश्रामगृहाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन
पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्याहस्ते झाले. त्यावेळी त्या
बोलत होत्या. जलसंपदा, शिक्षण, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, आ. बळवंत वानखडे, जिल्हापरिषदेचे
अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दर्यापूरच्या
नगराध्यक्ष नलिनीताई भारसाकळे, माजी सभापती जयंतराव देशमुख, उपविभागीय अधिकारी प्रियंका
आंबेकर, तहसीलदार योगेश देशमुख, साप्रविच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, चंद्रकांत
मेहेत्रे आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना संकटकाळातही
विकासाची प्रक्रिया थांबलेली नाही. अनेकविध कामे पूर्णत्वास जात आहेत. उज्ज्वल परंपरा
असलेल्या दर्यापूर शहराच्या लौकिकात नूतन इमारतींमुळे भर पडली आहे. यापुढेही पायाभूत
सुविधांच्या उभारणीसाठी निधी कमी पडू देणार नाही.
तहसील कार्यालय व इतर इमारतीसाठी आवश्यक निधीही मिळून सहा महिन्यात कामे मार्गी लागतील यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. कोरोना प्रतिबंधांसाठी दक्षता त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले.आ. वानखडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी दर्यापूरचे नप उपाध्यक्ष सागर गावंडे, सभापती किरणताई गावंडे, सभापती ईबादुल्ला शाह अब्दूल्ला शाह, दिलीप चव्हाण, शहादतखान पठाण, सुधाकर भारसाकळे, अरुण गावंडे, बासंतीताई मंगरूळे, अनिल जळमकर, अमोल गहरवार, प्रमोद टेकाडे , ताज खातून अजीजउल्ला खान , अस्लम अब्दूल मजिद घानीवाले , प्रतिभाताई शिवणे , महफुजा बी पटेल , सुमित ढोरे उपस्थित होते . कार्यक्रमाचे आभार मोहम्मद नईमचर यांनी मानले.
MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर
नक्की वाचा (Must Read)
अधिक वाचा –Read More
नक्की वाचा (Must Read)
- संजय गांधी निराधार योजना तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी तपशिल पहा
- अटल पेन्शन योजना तपशिल पहा
- आंतरजातीय विवाह योजना तपशिल पहा
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना तपशिल पहा
- पंतप्रधान सुरक्षा विमा योजना तपशिल पहा
- घरगुती कामगार योजना तपशिल पहा
- आयुष्मान भारत योजना तपशिल पहा
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तपशिल पहा
- प्रधान मंत्री उज्ज्वला योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना तपशिल पहा
- ई-शिष्यवृत्ती तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- प्रधानमंत्री किसान सम्मान योजने अंतर्गत लाभ प्राप्त शेतकरी यांची यादी तपशिल पहा
- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
नक्की वाचा (Must Read)
0 टिप्पण्या