Maharashtra State Election Commission

 नागरीक सेवा- निवडणूक विभाग

राज्य निवडणूक आयोगाबद्दल    

    भारतीय संविधानाच्या 73 व 74 दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना दि.26 एप्रिल, 1994 रोजी करण्यात आली. संविधानातील भाग -9 मधील अनुच्छेद 243 ट (243 K) नुसार ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हापरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत) व अनुच्छेद 243 यक (243 ZA) नुसार नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत) यांच्या निवडणुका घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आलेली आहे. संविधानातील सदर अनुच्छेदातील तरतुदीनुसार ‘निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे अधिक्षण, संचलन आणि नियंत्रण आणि अशा निवडणुकांचे आयोजन ’ अशी जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविलेली आहे.

    महाराष्ट्र शासनाच्या https://mahasec.maharashtra.gov.in/ या वेबसाईट वर राज्य निवडणूक आयोगाबद्दल संपूर्ण माहिती मिळते

मतदान केंद्र यादी मध्ये नाव शोधने

Click Here



नक्की वाचा (Must Read)

नक्की वाचा (Must Read)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या