अमरावती जिल्ह्यातील ‘रमाई आवास योजना’ अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून द्या !

 
 Video पाहण्यासाठी येथे Click करा

अमरावती जिल्ह्यातील ‘रमाई आवास योजना’ अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून द्या ! आमदार बळवंत वानखडे यांनी केली सामाजिक न्याय मंत्री यांचे कडे मागणी

अमरावती जिल्ह्यातील ‘रमाई आवास योजना’ अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा वार्षिक योजनेतून समाजकल्याण विभागामार्फत निधी मिळत होता. परंतू सन 2016 पासून सदर निधी मिळणे बंद झाला आहे. 

आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेचा निधी जिल्हा वार्षिक योजनेमधून देण्यात येत आहे. परंतू रमाई आवास योजनेचा निधी कोणत्या विभागामार्फत वितरीत करण्यात येणार याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. सन 2016 पासून निधी अप्राप्त असल्याने मोठ्या प्रमाणावर घरकुल लाभार्थी लाभापासून वंचित आहेत.

तरी Amravati जिल्ह्यातील ‘रमाई आवास योजना’ अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना निधी मिळण्याबाबत दर्यापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बळवंत वानखडे यांनी सामाजीक न्याय विभागास पत्र लिहून कळविले आहे.

या प्रयत्नातून घरकुल लाभार्थ्यांना नक्की न्याय मिळेल असे आमदार बळवंत वानखडे यांनी या वेळी बोलतांना सांगितले.

Video पाहण्यासाठी येथे Click करा

नक्की वाचा (Must Read)

दर्यापूर

अंजनगाव सुर्जी 

अचलपूर

नागरिक सेवा

योजना

MPSCeStudy-

MLA Balwant Wankhade
 जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या